‘कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी...’; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 09:48 AM2024-04-09T09:48:20+5:302024-04-09T09:48:59+5:30

चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात; मराठीमध्ये केली भाषणाला सुरूवात

'Bitter carrots, fried in ghee, mixed with sugar...'; Modi's attack on Congress | ‘कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी...’; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

‘कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी...’; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : “माता महाकाली यांच्या पावनभूमीत शक्तीला नमन करून चंद्रपूरकरांना माझा नमस्कार,” अशा शब्दांत मराठीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. उद्यापासून गुढीपाडवा नवे पर्व सुरू होत आहे. सगळ्या बंधू-भगिनींना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा मराठीत शुभेच्छा देतानाच भाषणाच्या ओघात  ‘कडू कारले, तुपात तळले, सारखेत घाेळले तरी कडू ते कडूच’ अशी म्हण वापरून काँग्रेसवाले कधी सुधारणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी प्रहार केला. 

काश्मीरमधील अशांततेबद्दल बाळासाहेब ठाकरे काँग्रेसवर सडकून टीका करायचे. ते देश जाेडणाऱ्या शक्तींसाेबत सदैव राहिले; पण, नकली शिवसेनेवाले काँग्रेसच्या मदतीने देश ताेडण्याची भाषा करणाऱ्या लोकांसोबत तसेच सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया म्हणणाऱ्यांसोबत मुंबईत रॅली करतात, अशी उद्धवसेनेवर सडकून टीका मोदींनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आम्ही वेगाने काम करतो आहोत. नियत चांगली असली की निकालही चांगलेच येतात, असे ते म्हणाले. 

पंतप्रधान मोदींच्या भाषणातून....
nगडचिराेली पोलाद कॅपिटल : आमच्या कार्यकाळात देशाला विकासाच्या मार्गावर नेले, गडचिराेलीतील नक्षलवाद कमजाेर केला, आता गडचिराेली ही देशाची पोलाद कॅपिटल म्हणून म्हणून ओळखली जाईल. त्यामुळे देशात केवळ एकच गॅरंटी चालते ती म्हणजे माेदींची गॅरंटी.
nमाेदींनी नाही, एका मताने बदलले भविष्य : भाजप एनडीए सरकारने माेठे निर्णय घेतले, विकास गतिमान केला. दलित, आदिवासी आणि मागास कुटुंबांचे आयुष्य बदलण्यासाठी काम करून दाखवले. चार कोटी लोकांना घरे मिळवून दिली. हे काेणी केले, हे काेणी केले? माेदींनी नाही केले, हे फक्त तुमच्या एका मताने केले, त्या एका मतामुळे माेंदीना ताकद मिळाली, मी कुठल्याही शाही घराण्यातून आलेलो नाही. तुम्हीच मला इथवर आणले आहे.
nचंद्रपूरचे सागवान राममंदिर व संसदेत : चंद्रपूरकरांचा स्नेह मला अधिक भावला आहे. चंद्रपूरच्या जंगलातील सागवान हे अयाेध्येच्या राम मंदिरात व नव्या भारताची ओळख असलेल्या संसदेत लागलेले आहे. त्यामुळे चंद्रपूरची ओळख देशभरात झाली आहे. 

माेदींच्या हातात संविधान मजबूत : आठवले

माेंदीच्या हातात संविधान मजबूत असून, गाेरगरीब जनतेचे भले करण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळे संविधान धाेक्यात आहे, अशी अफवा पसरविणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.
यावेळी आठवले यांनी आपल्या खास आणि चिरपरिचित शैलीत काही रचना ऐकवल्या. त्या अशा...
जे कधीच राहिले नाही 
कुणाचे मिंधे,
या ठिकाणी आले आहेत
एकनाथ शिंदे!
महाराष्ट्रातील महायुती मजबुतीसाठी
देवेंद्र फडणवीस यांचा आहे वाटा,
कारण त्यांनी काढला आहे
शरद पवार, उद्धव ठाकरेंचा काटा! 
..................
ज्या वेळी मी चंद्रपुरात येताे 
माझ्या आठवणीत येते चंद्रयान
साऱ्या जगाचे असते भारताकडे ध्यान,
या देशाची १४० काेटी जनता आहे
नरेंद्र माेदीजींची फॅन
या निवडणुकीत आम्ही लावणार आहे
इंडिया आघाडीवर बॅन!
..................
आम्ही करणार आहाेत चारशे पार,
मग का हाेणार नाही काँग्रेसची हार?

Web Title: 'Bitter carrots, fried in ghee, mixed with sugar...'; Modi's attack on Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.