कंत्राटी कामगाराच्‍या डेरा आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:19+5:302021-04-09T04:30:19+5:30

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय चंद्रपूर येथील ५०० कंत्राटी कामगार कुटुंबासह डेरा आंदोलनासाठी बसले आहेत. या कंत्राटी ...

BJP supports the Dera agitation of contract workers | कंत्राटी कामगाराच्‍या डेरा आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा

कंत्राटी कामगाराच्‍या डेरा आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा

Next

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय चंद्रपूर येथील ५०० कंत्राटी कामगार कुटुंबासह डेरा आंदोलनासाठी बसले आहेत. या कंत्राटी कामगारांना कोरोना काळातील कामाचे वेतन न दिल्‍यामुळे हे आंदोलन चालु आहे. हे कामगार कोरोना योद्धा आहेत; मात्र त्‍यांचे वेतन न देता त्‍यांचे शोषण सुरू आहे. त्‍यांचे थकीत वेतन त्‍वरित देण्‍यात यावे, अशी मागणी करत भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर शाखेने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे.

भाजपाचे चंद्रपूर जिल्‍हा महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, स्‍थायी समिती सभापती रवी आसवानी, सुभाष कासनगोट्टुवार, संदीप आवारी, संजय कंचर्लावार, पंकज अग्रवाल, धम्‍मप्रकाश भस्‍मे, रुनारायण तिवारी, चंदन पाल, रामकुमार आकापल्‍लीवार यांनी या आंदोलनाचे प्रणेते नगरसेवक पप्‍पु देशमुख यांना पाठिंब्‍याचे पत्र सादर केले. सदर कंत्राटी कामगारांच्‍या थकीत वेतनाबाबत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळाच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात विनियोजन विधेयकावरील चर्चेदरम्‍यान शासनाचे लक्ष वेधले; मात्र संवेदनाहीन शासनाने याकडे सातत्‍याने दुर्लक्ष केल्‍याचे डॉ. मंगेश गुलवाडे म्‍हणाले. या आंदोलनाला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असल्‍याचे महापौर कंचर्लावार म्‍हणाल्‍या.

Web Title: BJP supports the Dera agitation of contract workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.