नारंडातील शिबिरात ३१ रक्तदात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:12 AM2021-05-04T04:12:01+5:302021-05-04T04:12:01+5:30
कोरपना : तालुक्यातील नारंडा येथे कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत नारंडा, रक्तदान महादान नि:स्वार्थ सेवा ...
कोरपना : तालुक्यातील नारंडा येथे कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत नारंडा, रक्तदान महादान नि:स्वार्थ सेवा फॉउडेशन व आशिष ताजने मित्र परिवार यांच्या तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, कार्यक्रमाचे उद्घाटक नारंड्याच्या सरपंच अनुताई ताजने, प्रमुख पाहुणे आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी टेंभे, उपसरपंच बाळा पावडे, माजी सरपंच वसंता ताजने,पोलीस पाटील नरेश परसुटकर, डॉ. गावित,अनिल शेंडे उपस्थित होते. डॉ. स्वप्नील टेंभे व पोलीस पाटील नरेश परसुटकर यांचे भाषणे झाली.
यावेळी नारंडा परिसरातील ३१ रक्तदात्यांनी रक्तदान करत या पवित्र कार्यात सहभाग घेत माणुसकीचा परिचय दिला. यावेळी सत्यवान चामाटे, अजय तिखट,प्रवीण हेपट,अनिल मालेकर,प्रमोद शेंडे,अंकित परसुटकर,अरुण निरे, महेश बिल्लोरिया, साईनाथ तिखट, वैभव तिखट,विनोद कुचनकर, वैभव गंगमवार, संदीप चौधरी, हर्षल चामाटे, मनीष मालेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.