ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:28 AM2021-02-10T04:28:07+5:302021-02-10T04:28:07+5:30
ब्रह्मपुरी : गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली, तेव्हा आधी ब्रह्मपुरीचेच नाव जिल्ह्यासाठी घाेषित झाले होते. ऐन वेळी रात्रीतून गडचिरोली ...
ब्रह्मपुरी : गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली, तेव्हा आधी ब्रह्मपुरीचेच नाव जिल्ह्यासाठी घाेषित झाले होते. ऐन वेळी रात्रीतून गडचिरोली जिल्ह्याची घाेषणा झाल्याने ब्रह्मपुरीवर फार मोठा अन्याय झाला. आता तरी ब्रह्मपुरी जिल्हा घोषित करण्यात यावा, अशी येथील जनतेची मागणी आहे. ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण करावा, यासाठी कृती संसाधन समिती ब्रह्मपुरीद्वारा यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार धनश्री यादव यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना नुकतेच निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी अतिक्रमित शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे द्यावे, आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुका मतपत्रिकेने घ्याव्या, पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे, आवळगांव तालुका निर्माण करावा, आवळगावला रुग्णालय निर्माण करावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. यावेळी ॲड.नंदा फुले, ईश्वर जनबंधू, अरुण सहारे, अंकुश रामटेके, साैरभ सूर्यवंशी, माेतीलाल देशमुख, जयदेव हुमने, मदन रामटेके, साेनाली गजभिये, जगदीश निहाटे, कमलाकर गायकवाड उपस्थित हाेते.