जेवरा येथील नाल्यावर पुलाची अत्यंत जास्त आवश्यकता होती. गेल्या ६० वर्षांपासून पुलाची मागणी होती. पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत होता. पाऊस पडला तर शेतकऱ्यांना ये-जा करणे कठीण जात होते. कोरपनावरून जवळपास १२ किलोमीटरचा फेरा मारून त्यांना गावाला जावे लागत असत. नाल्यावरील पुरामध्ये अनेक जनावरेसुद्धा वाहून गेलेली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहेत. तत्कालीन वित्त व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार ॲड. संजय धोटे हे २१ जानेवारी २०१८ रोजी कोरपना दौऱ्यावर आले असताना भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष ताजने यांनी सर्व शेतकऱ्यांना घेऊन ही समस्या त्यांच्या लक्षात सदर समस्या लक्षात आणून देताच खनिज विकास निधी अंतर्गत १ कोटी ६० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आले आणि पुलाचा मार्ग मोकळा झाला. हा पूल २०२० मध्ये पूर्णत्वास आला. या पावसाळ्यात तो शेतकऱ्यांसाठी सोईचा झाल्याचे दिसून आले.
जेवरा येथील पूल झाला शेतकऱ्यांसाठी सोईचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:29 AM