प्रशासकीय भवन परिसरात संविधान शिल्प उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:24 AM2020-12-23T04:24:47+5:302020-12-23T04:24:47+5:30

मूल : येथील प्रशासकीय भवन परिसरात सर्व शासकीय कार्यालये आहेत. ही कार्यालये संविधानानुसार कार्य करीत आहेत. तालुक्यातील मुख्य शासकीय ...

Build a constitution sculpture in the administrative building area | प्रशासकीय भवन परिसरात संविधान शिल्प उभारा

प्रशासकीय भवन परिसरात संविधान शिल्प उभारा

googlenewsNext

मूल : येथील प्रशासकीय भवन परिसरात सर्व शासकीय कार्यालये आहेत. ही कार्यालये संविधानानुसार कार्य करीत आहेत. तालुक्यातील मुख्य शासकीय प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन कार्यक्रम सोहळा या प्रशासकीय भवन परिसरात दरवर्षी साजरा केला जातो. या परिसरात संविधान शिल्प उभारून संवर्धन व जतन करण्याची मागणी आम आदमी पार्टी मूलच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.

भारताचे संविधान हे संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ ला स्वीकारले व २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले. तेव्हापासून दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय दिन आहे. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत गाऊन आदर व्यक्त केला जातो. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा, महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन भाषणाचे आयोजन केले जाते. भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढयाचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर आधारित होते.संविधान समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधीनंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दरवर्षी भारतीय संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा होतो. निवेदन देताना आपचे गौरव शामकुळे, अमित राऊत, सचिन वाकडे, कुमुदिनी भोयर, संजना चिताडे, पियुष रामटेके, पंकज गेडाम, उत्तम आडे, विनोद मडावी, अक्षय गेडाम उपस्थित होते.

Web Title: Build a constitution sculpture in the administrative building area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.