उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:38 AM2020-12-30T04:38:26+5:302020-12-30T04:38:26+5:30

चंद्रपूर : राज्याचे मुख्‍य निवडणूक अधिकारी मदान यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करण्‍याची परवानगी दिली आहे. ...

Candidates can submit offline application | उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करता येणार

उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करता येणार

Next

चंद्रपूर : राज्याचे मुख्‍य निवडणूक अधिकारी मदान यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना

ऑफलाईन अर्ज सादर करण्‍याची परवानगी दिली आहे. इच्छूकांना नामांकन अर्ज सादर करण्यासाठी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. या निर्णयामुळे आता ही अडचण दूर झाली आहे.

बीएसएनएलच्‍या नेटवर्कमधील अनियमिततेमुळे उमेदवारांना त्रास सहन करावा लागत आहे. मंदगतीने इंटरनेट चालू असल्‍याने उमेदवार त्रस्‍त आहेत. लोकशाहीमध्‍ये ज्‍या निवडणूकीला गावपातळीवरील विधानसभा म्‍हटले जाते. अशा ग्रामपंचायत निवडणुकीमध्‍ये उमेदारांना अर्ज भरण्‍याच्‍या प्रक्रियेतच गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. राज्‍यातील इतरही जिल्‍हयांमध्‍ये ही समस्‍या उमेदारांना सहन करावी लागत आहे, याकडे माजी अर्थमंत्री व आमदार मुनगंटीवार यांनी मुख्‍य निवडणूक अधिकारी मदान यांचे लक्ष वेधले होते. या मागणीला सकारात्‍मक प्रतिसाद देत राज्‍य निवडणूक आयोगाने नामनिर्देशन पत्र पारंपरिक पध्‍दतीने अर्थात ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्‍याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर रोजी निर्देश पत्र राज्‍यातील सर्व जिल्‍हाधिका-यांसाठी निर्गमित केले.

Web Title: Candidates can submit offline application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.