कोरोना संसर्गावर नियंत्रण व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व कार्यालय प्रमुख व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. याशिवाय, चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रूग्णांची माहिती घेणे सुरू झाले. खासगी डॉक्टरांनी संशयितांना सल्ला दिल्यानंतर त्यांच्या आरटीपीसीआर चाचणी सुरू करण्यात आल्या.
निर्बंधामुळे काय साध्य झाले?
प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. यामध्ये प्राधान्य गटाचे उद्दिष्ट पूर्ण होत आहे किंवा नाही, याची माहिती केंद्रीय पथक जाणून घेणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी लावलेल्या निर्बंधामुळे काय परिणाम साध्य होत आहे तसेच त्यातील कमतरता यावर पथक बोट ठेवू शकते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून नव्या सुधारणांची अंमलबजावणी होऊ शकते.
‘अर्ली डिटेंशन’वर देऊ शकते सूचना
खासगी रूग्णालयांना भेटी देणे, सौम्य व अतिसौम्य लक्षणे असलेल्या बाधित किंवा संशयीत रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी गृह विलगीकरण व अलगीकरणाची परवानगी घेऊन नियमांचे पालन केले जाते किंवा नाही, याचीही तपासणी जि. प. आरोग्य विभाग व चंद्रपूर मनपा आरोग्य विभागाकडून करणे सुरू झाले. विशेष म्हणजे, दैनंदिन चाचण्यांची संख्या चार हजारपेक्षा जास्त झाली. सुपर स्प्रेडरही तपासणी कक्षात आले. यातून रूग्ण डिटेक्ट होण्याचे प्रमाण वाढून सौम्य लक्षणे असणाºयांचे गृहविलगीकरण व गंभीर रूग्णांना कोविड रूग्णालयात दाखल केले जात आहे. या ‘अर्ली डिटेंशन’ बाबत केंद्रीय पथक सूचना देऊ शकते.
सीसीसी, डिएचसी, डिसीएचसीत सुधारणा
जिल्ह्यात कोरोना उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य उपाययोजना म्हणून कोविड रूणालय, कोविड केअर सेंटर व यापूर्वी वापरात आलेल्या इमारतींची तपासणी करून सुविधा अपडेट करण्याचे काम सुरू झाले. त्यातही सुधारणा सूचविण्याची शक्यता आहे.