चंद्रपूर : जिल्ह्यांत 24 तासांत 342 कोरोनामुक्त, तर 177 नव्या रुग्णांची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 08:52 PM2021-06-03T20:52:55+5:302021-06-03T20:53:21+5:30

सूचनांचं पालन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन.

Chandrapur: 342 corona free, 177 new patients registered in the district in 24 hours | चंद्रपूर : जिल्ह्यांत 24 तासांत 342 कोरोनामुक्त, तर 177 नव्या रुग्णांची नोंद 

चंद्रपूर : जिल्ह्यांत 24 तासांत 342 कोरोनामुक्त, तर 177 नव्या रुग्णांची नोंद 

googlenewsNext
ठळक मुद्देसूचनांचं पालन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन.

चंद्रपूर : गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 342 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 177 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 5 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

गुरूवारी एकूण 2723 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 177 पॉझिटिव्ह तर 2546 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. बाधित आलेल्या 177 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 54, चंद्रपूर तालुका 21, बल्लारपूर 28, भद्रावती 27, ब्रम्हपुरी 3, नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 9, सावली 1, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 4, राजूरा 8, चिमूर 2, वरोरा 5, कोरपना 6, जिवती 5 व इतर ठिकाणच्या 3 रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 83 हजार 228 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 79 हजार 813 झाली आहे. सध्या 1 हजार 945 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 79 हजार 12 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 93 हजार 89 नमूने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1470 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1361, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 38, यवतमाळ 51, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Chandrapur: 342 corona free, 177 new patients registered in the district in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.