SNDT मध्ये बुधवारपासून घेता येणार प्रवेश, कुलगुरुंची घोषणा

By साईनाथ कुचनकार | Published: June 4, 2023 05:54 PM2023-06-04T17:54:43+5:302023-06-04T17:55:10+5:30

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बल्लारपुरात शुभारंभ

Chandrapur News Admission open to SNDT from Wednesday says Vice-Chancellor | SNDT मध्ये बुधवारपासून घेता येणार प्रवेश, कुलगुरुंची घोषणा

SNDT मध्ये बुधवारपासून घेता येणार प्रवेश, कुलगुरुंची घोषणा

googlenewsNext

साईनाथ कुचनकार, चंद्रपूर: एसएनडीटी विद्यापीठाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस डिजिटल शाळेमध्ये स्थापन होत असलेल्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या ज्ञानसंकुलाचा शुभारंभ होणार आहे.

ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाचा (एसएनडीटी) अभ्यासक्रम चंद्रपूरमधील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत आहे. बुधवार, ७ जून २०२३ पासून या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी मुनगंटीवार यांना पत्र पाठवत ही माहिती दिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस डिजिटल शाळेमध्ये विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे उद्घाटन होत असल्याने विद्यार्थी विश्वात आनंदाचे वातावरण आहे.या केंद्राचे उद्घाटन मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
बाॅक्स

१० अभ्यासक्रम होणार सुरू

या ज्ञानसंकुलात १० अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. दहा कौशल्याधारित अभ्यासक्रमांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व तरुणींना रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार आहे. या केंद्राचे सत्र जून २०२३ पासून सुरू होईल, अशी ग्वाही मंत्री मुनगंटीवार यांनी दिली होती.

Web Title: Chandrapur News Admission open to SNDT from Wednesday says Vice-Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.