२०२४ च्या ऑलम्पिकसाठी चंद्रपूरचे खेळाडू होणार सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:28 PM2019-07-31T14:28:04+5:302019-07-31T14:28:29+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करून चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशाचा झेंडा फडकावून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून दिले. या ‘मिशन शक्ती’चा शुभारंभ येत्या ४ ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे होऊ घातला आहे.

Chandrapur players to be ready for 2020 Olympics | २०२४ च्या ऑलम्पिकसाठी चंद्रपूरचे खेळाडू होणार सज्ज

२०२४ च्या ऑलम्पिकसाठी चंद्रपूरचे खेळाडू होणार सज्ज

googlenewsNext
ठळक मुद्दे४ ऑगस्ट रोजी आमिर खान करणार मिशन शक्तीचा भव्य शुभारंभ

राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करून चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशाचा झेंडा फडकावून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून दिले. या विद्यार्थ्यांची जिद्द पाहुनराज्याचे अर्थ व नियोजन, वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अपेक्षांना नवे बळ आले. त्यांनी देशाच्या प्रत्येक क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्याने नेतृत्व करावे, असा निर्धारच त्यांनी केला. हे प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांनी एक ‘मिशन’च हाती घेतले. त्याचाच एक भाग ‘मिशन शक्ती’चा शुभारंभ येत्या ४ ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे होऊ घातला आहे. या शुभारंभाकडे सर्व युवाशक्तीचे लक्ष लागलेले आहेत.
मिशन शक्तीच्या माध्यमातून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी २०२४ चे ऑलम्पिक डोळ्यासमोर ठेवले आहेत. गेल्या ११९ वर्षांमध्ये अमेरिकेने ऑलंम्पिकमध्ये तब्बल २ हजार ५२० पदके जिंकली. तर भारताने केवळ २८ पदके जिंकली आहेत. आपल्या देशात सोई-सुविधांचा अभाव असल्यामुळे खेळांडूना ऑलम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करता येत नाही. ही उणीव भरून काढण्याचे स्वप्न ना. मुनगंटीवार यांनी मिशन शक्तीच्या माध्यमातून बघितले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दहापैकी सात विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर आता ना. मुनगंटीवार यांनी २०२४ च्या ऑलम्पिकसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडंूना पूर्ण ताकदीनिशी तयार करण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे, राजकारण करीत असताना त्यांनी जो निर्धार केला तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केला आहे. हे अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्याच अनुषंगाने मिशन शक्तीचा शुभारंभ अवघ्या वर्षभरात करण्यात येत आहे. याप्रसंगाचे साक्षदार होण्याचे निमंत्रण ना. सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षीच दि.२१ ऑगस्ट २०१८ रोजी आमिर खान यांना दिले होते. दरम्यान, आमिर खान यांनीही ताडोबा, चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंपदा, खाणींबाबत जाणून घेताना आपली त्याबाबतची आपली रुची दाखविली होती. तसेच त्यांनी हे निमंत्रण स्वीकारत पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली होती. हा क्षण आता अवघ्या काही दिवसांवर आहे. या कार्यक्रमात माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार आमिर खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.

काय आहे सुधीर मुनगंटीवारांचे ‘मिशन’
चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचे स्वप्न बाळगतानाच त्यांनी एक मिशनही आपल्या डोळ्यासमोर ठेवले आहे. आणि ते मिशन पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचालही सुरू केली. त्यांचे पहिले मिशन होते ‘मिशन शौर्य’. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी मुला-मुलींना माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी सज्ज करून पाठविले. आणि या विद्यार्थ्यांनी ते सर करून चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. दुसरे - ‘मिशन सेवा’ या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून देशातील उच्च पदे काबीज करावी. यासाठी त्यांनी जिल्ह्यात सर्वत्र अत्याधुनिक व सुसज्ज अशी वाचनालये उपलब्ध करून दिली आहेत. दररोज हजारो विद्यार्थी करताना दिसून येते. तिसरे - मिशन शौर्य भारतीय सैन्य दलात चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या पदावर असावेत. यासाठी त्यांनी देशात पहिल्या क्रमांकाची अत्याधुनिक सोर्इंनीयुक्त अशी देखणी सैनिकी शाळा चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर अवघ्या वर्षभरात उभी केली. ना. मुनगंटीवार यांचे चवथे मिशन आहे ‘मिशन शक्ती’. मिशन शक्तीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूने जागतिक पातळीवर जावून देशासाठी पदके आणावी. यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशात व जगात मोठ्या आदराने घेतले जाईल. यासाठी त्यांनी बल्लारपूर येथे सर्वसार्इंनी युक्त अशा क्रीडा संकुलाची निर्मिती केली आहे. त्याचा शुभारंभ ४ ऑगस्टला होऊ घातला आहे.

Web Title: Chandrapur players to be ready for 2020 Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.