चंद्रपूर पोलिसांनी रोखला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:45 PM2019-02-28T12:45:08+5:302019-02-28T12:46:06+5:30

शहरातील लालपेठ कॉलरी येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह २३ वर्षीय युवकाशी होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी सोमवारी थेट लग्नमंडप गाठून बालविवाह रोखला.

Chandrapur police prevented child marriage | चंद्रपूर पोलिसांनी रोखला बालविवाह

चंद्रपूर पोलिसांनी रोखला बालविवाह

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिलीच घटना तंबी देऊन पालकांना सोडून दिले


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील लालपेठ कॉलरी येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह २३ वर्षीय युवकाशी होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी सोमवारी थेट लग्नमंडप गाठून बालविवाह रोखला.
लालपेठ येथे एका १४ वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती निनावी फोनद्वारे शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच लग्नमंडप गाठले. पोलीस लग्नमंडपात दिसताच सारेच स्तब्ध झाले. पोलिसांनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या नातेवाईकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, घटनेची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना देण्यात आली. माहिती मिळताच अजय साखरकर, समुपदेशिका प्रिया पिंपळशेंडे हे शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात प्रिया पिंपळशेंडे यांनी अल्पवयीन मुलगी व तिच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून दंड आणि शिक्षेची तरतूद असल्याची माहिती संबंधिताना देण्यात आली. यावेळी मुलीच्या पालकासह तिच्या नातेवाईकांनी मुलीचे वय १८ वर्ष झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी हमी दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
सदर प्रकरण पुढील कारवाईसाठी बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले आहे. यावेळी चंद्रपूर शहरचे एपीआय ठाकूर, पीएसआय नागपूरे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अजय साखरकर, समुपदेशक प्रिया पिंपळशेंडे, नगरसेवक बंटी परचाके यांनी हे प्रकरण हाताळले.

Web Title: Chandrapur police prevented child marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.