सांगली पूरग्रस्तांना चंद्रपूरकरांचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:41 AM2019-08-20T00:41:03+5:302019-08-20T00:41:50+5:30
मागील आठवड्यामध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे सांगली तसेच कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात पुराने थैमान घातले. अनेक गावांमध्ये पुुरपरीस्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक व अस्मानी संकटामध्ये जिवीत तसेच आर्थिक हानी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील आठवड्यामध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे सांगली तसेच कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात पुराने थैमान घातले. अनेक गावांमध्ये पुुरपरीस्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक व अस्मानी संकटामध्ये जिवीत तसेच आर्थिक हानी झाली. अशा संकटसमयी सामाजिक दायित्वम्हणून बांबू संसोशन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांच्यामार्फत घेतलेल्या उपक्रमातून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चंद्रपुरातील नागरिक, व्यावसायिक, हिरवई बहुउद्देशीय संस्था, विसापूर, गायत्री महिला बचत गट तसेच कार्यालयीतील कार्यरत कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत केली.
आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त रक्कम गोळा झाली असून सदर रक्कम स्वराज्य सामाजिक संस्था, बिळाशी या सामाजिक संस्थेला सुपूर्द करण्यात आली आहे.
याप्रसंगी सांगली येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, बिआरटीसी चिचपल्लीचे संचालक राहुल पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी आशिष येरेकर आदींची उपस्थिती होती.
गोळा झालेल्या रकमेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील मराठेवाडी, चांदूलवाडी, पाटीलवाडी, खालवाडी, सोंडोली, संगाव या गावांतील १६५ कुटुंबाला धान्याची किट सांगली येथील सहाय्यक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.
आर्थिक मदत
भद्रावती : सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. भद्रावती येथील राजू मत्ते यांनी सामाजिक दायित्व या नात्याने पुरग्रस्तांना पाच हजार रूपयाचा निधी दिला. त्यांनी मतनिधीचा धनादेश तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडे सुपुर्द केला.