शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
2
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
3
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
4
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
5
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
6
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
7
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
8
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
9
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
10
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
11
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
12
मिशन 2025! बिहार काबीज करण्यासाठी सीएम नितीश कुमारांनी आखली खास योजना
13
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
14
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
15
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
16
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
17
माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली
18
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
19
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
20
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक

चंद्रपूरकरांनो, तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:38 AM

चंद्रपूर : शहरातील सुमारे साडेचार लाख नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी मनपाची आहे. मात्र, पिण्याचे पाणी शुद्ध ...

चंद्रपूर : शहरातील सुमारे साडेचार लाख नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी मनपाची आहे. मात्र, पिण्याचे पाणी शुद्ध मिळते काय, हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. त्यामुळे मनपाने कंत्राटदाला दिेलेले काम बंद करून पाणी पुरवठ्याची यंत्रणा स्वत:कडे घेतली. आजमितीस दर महिन्याला १०० ते ११० पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाते. त्याचा अहवाल सकारात्मक आला तरच पाणी पुरवठा सुरू केला जातो. अन्यथा तातडीने दुरूस्ती करून पुढील प्रक्रियेनंतर पाणी सोडले जातो, असा दावा मनपाने केला आहे.चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेला बरेच वर्षे झाले. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सध्याची पाणी पुरवठा यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे मनपाने अमृत अभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजनेला प्राधान्य दिले. या योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. यासाठी केंद्र शासन ५० टक्के, राज्य व महानगर पालिका प्रत्येकी २५ टक्के वाटा उचलत आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जबाबदारी दिली. पाणी टंचाई निधीतून इरई डॅमवर बंधारा, वीज पंप लावण्यात आला. शहरातील विविध प्रभागात हातपंप व इंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. मात्र, इरई धरणातून होणा-या पाणी पुरवठ्यावरच मनपाची खरी मदार आहे. परिणामी, शहरवासींना पुरविण्यात येणारे पाणी शुद्ध ठेवण्यासाठी मनपाला गंभीरतेने लक्ष द्यावे लागणार आहे. सध्या दोन जलशुद्धीकरण केंद्र सुरू आहेत. १७ प्रभागात १२ पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांचीही नियमित स्वच्छता केली जाते. शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी सध्या तरी अमृत योजना सुरू करणे हाच मनपाचा प्राधान्य विषय असल्याचे दिसून येत आहे.

१७ प्रभागातून घेतले जातात पाण्याचे नमुने

चंद्रपूर महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरातील १७ प्रभागातून पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा केले जाते. पाण्यातील घटक नागरिकांसाठी पोषक आहे की नाही याची तपासणी केली जाणार असल्याने नमुने घेताना राज्य शासनाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन केले जाते. याबाबत पाणी पुरवठा अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कर्मचा-यांना प्रशिक्षित करण्यात आले.

अशी होते तपासणी

तपासणीसाठी सुमारे अर्ध्या लिटरच्या बाटलीत (बाटली १०-१५ वेळा त्याच पाण्याने धुवून) पाणी भरून २४ तासांच्या आत ते जल तपासणी प्रयोगशाळेत पाठवावे लागते. यासाठी पक्के बूच असलेली बाटली निवडली जाते. प्रयोगशाळेत निरनिराळया तपासण्या करून, पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू आहेत काय, गढूळ पाणी मिसळले आहे काय, ते पिण्याजोगे शुद्ध आहे काय, याचा अहवाल मिळतो. आता पाणी तपासणीसाठी तयार किट्स मिळतात. ही पट्टी पाण्यात बुडवल्यावर तिचा रंग सेकंदानंतर बदलल्यास जीवाणू आहेत, असे समजावे. याचा अर्थ म्हणजे पाणी दूषित आहे.

कोट

चंद्रपूरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जलशुद्धीकरणाकडे विशेष लक्ष दिल्या जात आहे.

पाणी नुसत्या साध्या डोळयांनी पाहून शुद्ध की अशुद्ध हे सांगणे अवघड आहे. त्यासाठीच प्रयोगशाळेत तपासणी करणे बंधनकारक आहे. प्रयोगशाळेचा अहवाल सकारात्मक आल्यानंतरच पाणी पुरवठा केला जातो.

-विजय बोरीकर, अभियंता पाणी पुरवठा, मनपा, चंद्रपूर