लोकमत न्यूज नेटवर्कसावली : दारुसाठा येत असल्याची माहिती सावलीतील डी.बी. पथकाला मिळताच नाकाबंदी केली. मात्र पोलिसांना पाहून दारुतस्करांनी वाहन घेऊन पळ काढला. दरम्यान पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करुन ४० बॉक्स देशी दारु व वाहन असा दहा लाखांचा दारुसाठा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बोथली नाल्याच्या पुलावर करण्यात आली. या कारवाईत नितेश यशवंत नर्मलवार रा. मूल याला अटक करण्यात आली आहे.सावली येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी दारुविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. गुरुवारी ठाणेदार खाडे यांना दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर हिरापूर बसस्थानकावर नाकाबंदी करण्यात आली. मात्र दारु वाहून नेणाऱ्या वाहनाला पोलीस दिसताच वाहन न थांबविता बोथली गावाकडे पळ काढला. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन बोथली गावाचे पलिकडे नदीच्या पुलावर सदर वाहनाला गाठून वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनातून दारुसाठा जप्त करण्यात आला.ही कारवाई ठाणेदार खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली केवलराम उईके, सुमीत मेश्राम, दीपक डोंगरे, प्रफुल्ल आडे, नरेश डाहुले, कुमरे यांनी केली.
पाठलाग करून दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 6:00 AM
सावली येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी दारुविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. गुरुवारी ठाणेदार खाडे यांना दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर हिरापूर बसस्थानकावर नाकाबंदी करण्यात आली.
ठळक मुद्देसावली पोलिसांची कारवाई : वाहनचालकाला अटक