राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ‘गुलामी अब नहीं होना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिये मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’ या राष्ट्रसंताच्या क्रांतिकारी भजनाचे बोल प्रत्येकाच्या कानात घुमत होते. १६ ऑगस्ट १९४२ चा तो नागपंचमीचा दिवस. त्यामुळे घराघरात नागपंचमीच्या बाºया बोलल्या जात होत्या. नागपंचमीच्या बाऱ्या आणि क्रांतीच्या ज्वाला यातूनच चिमुरातील क्रांतिकारकांनी इंग्रज जुलमी अधिकारी एसडीओ डुंगाजी, नायब तहसीलदार सोनवणे व जरासंध यांचा वध केला. यासाठी तीन क्रांतिकारक शहीद झाले होते. त्यामुळे १६ ऑगस्ट १९४२ ची नागपंचमी रक्तरंजित ठरली होती.इंग्रजाची जुलमी सत्ता भारतातून उलथवून लावण्यासाठी महात्मा गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथील ग्वालिया टॅन्क मैदानावर करा अथवा मराचा संदेश दिला. या संदेशाने तरुणांना स्फूर्ती दिली. या आदेशाने चिमूर येथील युवा क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यांसाठी गुप्त बैठका व प्रभात फेºया काढण्यास १२ ऑगस्ट १९४२ पासून सुरुवात केली. याच परिसरात वास्तव्यास असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गावागावात भजनाच्या माध्यमातून युवकांना स्वातंत्र्याविषयी प्रेरित करीत होते.१६ ऑगस्ट १९४२ ला नागपंचमीचा दिवस असल्याने घराघरात नागदेवतेची पूजा करून बाºया बोलल्या जात होत्या. अशातच सकाळी ९ वाजता गोपाळराव कोरेकार यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व प्रभातफेरी काढली. या फेरीत काँग्रेस, सेवादल व संघाचे कार्यकर्ते एकत्र आले. प्रभातफेरी जुना बसस्थानक येथे आली. तिथे ‘वाईसराय दिल्ली मे, जुते खाये गल्ली मे’ अशा घोषणा देत नागमंदिराकडे जात होती. नागपंचमीमुळे शेकडो नागरिक जमा झाले होते. मात्र काही क्रांतिकारकाच्या मनात वेगळेच होते.‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना’ राष्ट्रसंताच्या या भजनाने प्रेरित झालेल्या क्रांतिकारकांपैकी सेवादलाचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला व सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदानावर येऊन ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देऊ लागले. तेवढ्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यविरांच्या हातातील तिरंगा झेंडा हिसकावून घेतला व बारा क्रांतिकारकाना तुरुंगात डांबले. या घटनेने चिडून क्रांतिकारकांनी आपला मोर्चा इंग्रज अधिकारी डुंगाजी, सोनवाणे व जरासंध यांच्याकडे वळविला व या तिन्ही इंग्रज अधिकाºयांना यमसदनी धाडले. याच दिवशी १६ वर्षांचा बालाजी रायपूरकर, श्रीराम बिंगेवार व बाबुलाल झिरे हे शहीद झाले.पाच फण्याची नागमूर्ती देते क्रांतीची प्रेरणाचिमूर येथील क्रांतीवीर व हुतात्म्यांचे स्मरण भावी पिढ्यांना राहावे व त्यांच्या कार्यातून आजच्या युवकांना प्रेरणा मिळावी, याकरिता १६ ऑगस्ट १९५२ ला या स्मारकाचा शिलाण्यास करण्यात आला. हे हुतात्मा स्मारक लांबी, रुंदी व ऊंचीने १६ बाय १६ फूट असून त्यावर पाच फण्यांची नागदेवतेची मूर्ती आहे. त्यावर हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत.
‘त्या’ नागपंचमीच्या बाऱ्या अन् चिमूरचा क्रांती लढा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 5:00 AM
१६ ऑगस्ट १९४२ चा तो नागपंचमीचा दिवस. त्यामुळे घराघरात नागपंचमीच्या बाºया बोलल्या जात होत्या. नागपंचमीच्या बाºया आणि क्रांतीच्या ज्वाला यातूनच चिमुरातील क्रांतिकारकांनी इंग्रज जुलमी अधिकारी एसडीओ डुंगाजी, नायब तहसीलदार सोनवणे व जरासंध यांचा वध केला. यासाठी तीन क्रांतिकारक शहीद झाले होते. त्यामुळे १६ ऑगस्ट १९४२ ची नागपंचमी रक्तरंजित ठरली होती.
ठळक मुद्देइंग्रज अधिकाऱ्यांचा केला होता वध : चिमूरकरांची ‘ती’ नागपंचमी झाली रक्तरंजित