जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७४ हजार ३७३ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून बरे झालेल्यांची संख्या ६१ हजार ५१६ झाली आहे. सध्या ११ हजार ६८२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ४ लाख २१ हजार ९९७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ४३ हजार ८७३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात २४ तासात १५४० कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ११६५ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १०७५ , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३५, यवतमाळ ३७, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापरावा, वारंवार हात धुवावे, सुरक्षित अंतर तसेच कोरोनाची लस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत जिल्ह्यातील मृत
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील पठाणपुरा वाॅर्ड येथील ७० वर्षीय पुरुष, घुटकाळा वाॅर्ड येथील ४८ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, ५६ वर्षीय पुरुष, ४९ वर्षीय पुरुष, तुकूम येथील ५८ वर्षीय पुरुष, बालाजी वाॅर्ड ३५ वर्षीय पुरुष, गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील ७० वर्षीय पुरुष, नगीनाबाग परिसरातील ५२ वर्षीय पुरुष, बाबूपेठ येथील ६८ वर्षीय पुरुष, ६३ व ६५ वर्षीय महिला, ७५ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिला. कढोली येथील ४० वर्षीय पुरुष, लोहारा येथील ४७ वर्षीय पुरुष, शेगाव ६५ वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील घोसरी येथील ५५ वर्षीय पुरुष, आष्टी येथील ४१ वर्षीय पुरुष, घोडपेठ येथील ५८ वर्षीय महिला, आंबेडकर वाॅर्ड माजरी येथील ६० वर्षीय पुरुष व ७७ वर्षीय पुरुष, वरोरा एकार्जुना येथील ६३ वर्षीय पुरुष, सावली तालुक्यातील ३० वर्षीय पुरुष, गडचांदूर येथील ६० वर्षीय महिला, कोरपना तालुका वनोजा येथील ४५ वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील सोमनाथपूर येथील ४८ वर्षीय महिला व साखरी येथील ५५ वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील ५२ वर्षीय महिला, ३४ वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, माळडोंगरी येथील ६० वर्षीय पुरुष, कोसंबी येथील ६० वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, मूल येथील ५२ वर्षीय पुरुष. गोंडपिपरी वढोली येथील ४२ वर्षीय पुरुष, वणी येथील ४३ वर्षीय पुरुष, ७५ वर्षीय महिला तर लाखांदूर येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तालुुकानिहाय पॉझिटिव्ह
चंद्रपूर मनपा क्षेत्र २५१
चंद्रपूर तालुका ५९
बल्लारपूर १३८
भद्रावती ११९
ब्रह्मपुरी ३७
नागभीड १६
सिंदेवाही १९
मूल ७०
सावली ३४
पोंभुर्णा ४२
गोंडपिपरी ३४
राजुरा ४८
चिमूर २४
वरोरा ६५
कोरपना ५३
जिवती १०
इतर २०