३० एप्रिलपर्यंत पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:25 AM2021-04-03T04:25:09+5:302021-04-03T04:25:09+5:30
शाळा बंद असली तरी जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग ऑनलाइन सुरू राहतील, तसेच इयत्ता दहावी ...
शाळा बंद असली तरी जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग ऑनलाइन सुरू राहतील, तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे वर्ग कोविड-१९ च्या सर्व सुरक्षाविषयक नियमांचे पालन करून पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियमितपणे व आवश्यकतेनुसार शाळेत उपस्थित राहतील. शिक्षक शाळेत येऊन ऑनलाइन वर्ग घेतील, तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेकरिता शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार काम करतील.
सर्व शाळांना कोविड-१९ च्या अनुषंगाने राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाची कोणतेही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी अंमलबाजवणी करण्यास टाळाटाळ केल्यास; अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता, तसेच साथरोग कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.