भानापेठ वॉर्डात सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:11+5:302021-09-19T04:29:11+5:30
यावेळी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, झोन सभापती खुशबू चौधरी, सभागृह नेते संदीप आवारी, भानापेठ प्रभागातील नगरसेवक संजय कंचर्लावार, ...
यावेळी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, झोन सभापती खुशबू चौधरी, सभागृह नेते संदीप आवारी, भानापेठ प्रभागातील नगरसेवक संजय कंचर्लावार, राजू अडपेवार, आशा आबोजवार, शीतल कुळमेथे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला स्थानिक नागरिक बबन बांगडे, दीपक गवाल्पंछी, बबन विटेकर, श्रीराम वासेकर, गंगाधरराव चांदेकर, प्रतापसिंह चंदेल, विलासराव वेगीनवार संजयसिंह गवाल्पंछी, अनुप वेगीनवार, देवेंद्रसिंह गवाल्पंछी, प्रल्हादसिंह चंदेल, राजू पचारे, प्रवीण बावणे, प्रवीण उरकुडे, रामजित यादव, सौरभ वासेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन यश बांगडे यांनी केले.
-------
आदिम जमातीच्या विकासाकरिता विविध योजना
चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, केंद्रीय क्षेत्र योजनेंतर्गत आदिम जमातीच्या विकासाकरिता शेळी गट वाटप योजना (१० शेळ्या व १ बोकड), औषधी वनस्पतीची लागवड व फलोद्यान, कृषी व पशुपालन प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, जिवती, कोरपना, पोभुर्णा, गोंडपिपरी, मूल, सिंदेवाही, सावली या तालुक्यांमधील अधिवास असलेल्या कोलाम जमातीच्या लाभार्थ्यांकडून या योजनांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या व अटींची पूर्तता करणाऱ्या आदिम जमातीच्या लाभार्थ्यांनी परिपूर्ण कागदपत्रांसह आपले अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावे. या योजनेचे अर्ज प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर, शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय मुला-मुलींचे वसतिगृह येथे २० सप्टेंबर या कालावधीत नि:शुल्क उपलब्ध आहेत. शेळी गट वाटप योजना दुर्गम भागातील आदिम जमातीचे कुटुंब शेतमजूर, भूमिहीन असावे, वार्षिक उत्पन्न २० हजारांच्या आत, लाभार्थी कुटुंबाकडे किमान ३०० चौ. मी. स्वतःची जागा असावी, तसेच यापूर्वी लाभार्थी कुटुंबाने अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
व्हायरल तापाचे रुग्ण वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत असतानाच अनेकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीसह खासगी रुग्णालयांच्या ओपीडींमध्ये व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यामध्ये जीवघेण्या तापाचेसुद्धा रुग्ण असल्याने काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे दिसून येतात. मात्र, मागील वर्षी आलेल्या कोरोनाने दहशत पसरली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच डेंग्यू, मलेरिया, मेंदुज्वर आदी प्राणघातक तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी ओपीडीतसुद्धा रुग्ण वाढले असल्याचे दिसून येत आहे.