सीटूच्या अधिवेशनाचा समारोप
By admin | Published: January 8, 2017 12:51 AM2017-01-08T00:51:08+5:302017-01-08T00:51:08+5:30
सीआयटीयूचे १२ जिल्हा अधिवेशन आनंद भवन, भानापेठ येथे कॉ. वामन बुटले यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले.
चंद्रपूर : सीआयटीयूचे १२ जिल्हा अधिवेशन आनंद भवन, भानापेठ येथे कॉ. वामन बुटले यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून सीटूचे राज्य सचिव कॉ. अमृत मेश्राम उपस्थित होते. सीटूचे जिल्हा महासचिव कॉ. रमेशचंद्र दहिवडे यांनी तीन वर्षात सीटूचे नेतृत्त्वात झालेल्या विविध आंदोलनाचा अहवाल मांडला. प्रतिनिधींनी अहवालावर चर्चा केली व मांडण्यात आलेला अहवाल एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी कॉ. अमृत मेश्राम म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणाविरोधात असंघटित व संघटित कामगारातही असंतोष वाढला आहे. सरकारी आकडेवारी नुसार, देशातील १८ कोटी कामगार कर्मचारी रस्त्यावर उतरले. यत प्रा. दहिवडे म्हणाले की, सतत वाढणाऱ्या महागाईमुळे जनता हवालदिल झाली आहे. रस्त्यावर व बांधकामावर करोडो रुपये खर्च करणाऱ्या सरकारजवळ कामगारांना किमान वेतन देण्यासाठी पैसा नाही. मानधनावर काम करणाऱ्या योजना कर्मचाऱ्यांना मानधन देण्यासाठी पैसा नाही. कॉ, एस.एच. बेग सरकारवर यांनीही टीका केली. याप्रसंगी सीटूच्या नवीन कमिटीत प्रल्हाद वाघमारे यांची अध्यक्ष म्हणून तर सिटूचे महासचिव म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांची निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)