भाजपने दोन ग्रामपंचायतीत स्पष्ट बहुमत मिळविले असून, एका ठिकाणी गोंडवानासोबत आघाडी करून तर तीन ठिकाणी शेतकरी संघटनेसोबत युती करून सत्ता संपादन केली आहे. यावेळी शेतकरी संघटनेला नुकसान सहन करावे लागले असून, वनोजा या एकमेव ग्रामपंचायतमध्ये स्पष्ट बहुमत, तर सहा ग्रामपंचायतींत काँग्रेस-भाजप-गोंडवाना-मनसे- वंचित इत्यादी पक्षांसोबत आघाडी करून बहुमत मिळवले. निवडणुकीपूर्वी केवळ तीन ग्रामपंचायतींत सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसने आठ ग्रामपंचायती काबीज केल्याने तालुक्यात काँग्रेस सरस ठरली आहे.
तालुक्यातील शेरज बु.-काँग्रेस, हिरापूर-काँग्रेस व शेतकरी संघटना आघाडी, तळोधी-काँग्रेस, गाडेगाव-काँग्रेस, नांदगाव-काँग्रेस, भोयगाव-काँग्रेस, कढोली - काँग्रेस, सांगोडा-शेतकरी संघटना व काँग्रेस आघाडी, शेरज खु.-अविरोध, लोणी-भाजप, नोकारी-गोंडवाना व भाजप, नारंडा-भाजप, आवाळपूर-शे. संघटना-मनसे-गोंडवाना व वंचित, भारोसा-शेतकरी संघटना, वनोजा- शेतकरी संघटना, कोडशी-शेतकरी संघटना व भाजप आघाडी, पिपरी- शेतकरी संघटना व बीजेपी युती असे सत्ता परिवर्तन झाले आहे.
तळोधी, भोयेगाव व कढोली या तीन मोठ्या ग्रामपंचायती काँग्रेसने शेतकरी संघटनेकडून हिसकावल्या असून, नारंडा व लोणी या दोन मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपला आपली सत्ता अबाधित राखता आली. मात्र नांदगाव व शेरज बु. येथे सत्तांतर झाले असून, भाजपकडून काँग्रेसने या दोन्ही ग्रामपंचायत हिसकावल्या आहे.
नांदगावात दहा वर्षांनंतर सत्तापरिवर्तन
नऊ सदस्यीय नांदगाव गट ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये भाजप सत्तेत होती. मात्र यावेळी काँग्रेसने बाजी मारली आहे.
भारोसा ग्रामपंचायतीमध्ये रवींद्र गोखरे पंचायत समितीचे माजी सभापती शेतकरी संघटना यांनी सत्ता प्रस्थापित केली, मात्र याच गावातील पंचायत समिती सभापती यांच्या हातून सत्ता निसटता पराभव झाला.