नागभीड : ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीवरून तालुक्यातील काँग्रेस, भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. नागभीड तालुक्यात नुकत्याच तीन टप्प्यांत झालेल्या ४३ ग्रामपंचायतींवर सरपंचांपैकी काँग्रेसचे २३ सरपंच विविध ग्रामपंचायतींवर विराजमान झाले असल्याचा तालुका काँग्रेस कमिटीने दावा केला आहे, तर भाजपनेही २१ ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच, उपसरपंच निवडून आल्याचे म्हटले आहे.
तालुका काँग्रेस कमिटीने केलेल्या दाव्यात कानपा, बिकली, मोहाळी, कोटगाव, पहार्णी, कोथुळणा, किरमीटी, ढोरपा, मौशी, पान्होळी, पांजरेपा, कोसंबी गवळी, कोर्धा, ओवाळा, वाढोणा, सावरगांव, बालापूर खु., मिंडाळा, नांदेड, वलनी, कन्हाळगांव, चारगांव चक आणि मांगरूड या ग्रामपंचायतींचा समावेश आहे, तर विलम, पेंढरी, पळसगांव खु., जनकापूर या ग्रामपंचायती अपक्षांकडे आणि नवेगांव हुंडेश्वरी ही ग्रामपंचायत शिवसेनेकडे असल्याचे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी म्हटले आहे.
तळोधी, कोथूळना, चिंधीचक, जनकापूर, किटाळी बोर, ओवाळा, पारडी, पेंढरी बरड, विलम, म्हसली, नवेगाव हुंडेश्वरी, सोनुली बूज, वैजापूर, बोंड, कोजबी माल, आकापूर, आलेवाही, चिकमारा, बाळापूर, देवपायली, मेंढा या ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा तालुका भाजपचे अध्यक्ष संतोष रडके यांनी केला आहे.