काँग्रेसचा सायकल मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:20 AM2018-02-02T00:20:00+5:302018-02-02T00:20:12+5:30
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूरतर्फे गुरुवारी सायकल मोर्चा काढून भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूरतर्फे गुरुवारी सायकल मोर्चा काढून भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले. मागील एका वर्षात गॅसच्या किमती १९ वेळा वाढल्या तर पेट्रोल दर प्रति लीटर ८१ रुपयांवर पोहचला आहे. गॅसची किंमत प्रति सिलिंडर ८१० रुपये झाली आहे. राज्यात इंधनावर वॅटसह विविध प्रकारचे कर लावले जात आहेत. पेट्रोल, डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून लुट सुरू आहे. याचा निषेध करण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, युवक काँग्रेसचे शिवा राव, ग्रामीण तालुका अध्यक्ष प्रल्हाद कामडी, मनपाचे माजी सभापती संतोष लहामगे, राजेश अड्डूर, सुनिता अग्रवाल, देवराव पाटील घटे, गणेश उईके, किशोर आवळे, अनिल मत्ते, राजु रेड्डी, उत्तम ठाकरे, प्रभाकर कात्रोजवार, अरविंद मडावी, आतिक कुरेशी, अंकिश मडावी, भारत मेंढे, भारत पाटील बल्की, अनिल भोयर, हितेश झामरे, विठ्ठल किरमिरे, महेश आवळे, अजय झाडे, प्रविण मेश्राम यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.