बेंबाळ आरोग्य केंद्राचे बांधकाम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:31 AM2021-05-25T04:31:38+5:302021-05-25T04:31:38+5:30
बेंबाळ येथे भरीव वस्ती असून, येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असून परिसरातील नांदगाव, नवेगाव (भु.), जुनासुर्ला, बाबराळा, बोंडाळा या ...
बेंबाळ येथे भरीव वस्ती असून, येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असून परिसरातील नांदगाव, नवेगाव (भु.), जुनासुर्ला, बाबराळा, बोंडाळा या गावांसह १३ गावे समाविष्ट आहेत. पोलीस दूरक्षेत्र अंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी, फुटाणा, चेक फुटाणा, दिघोरी, पिपरी देशपांडे, जुनगाव, देवाडा बुज येथील नागरिक उपचारासाठी येत असतात.
बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लोकसंख्येची व्याप्ती लक्षात घेता येथे रुग्णालयाच्या नवीन इमारतीला मान्यता मिळाली असल्याने मागील दोन वर्षांपासून बांधकाम केले जात असून, संबंधित कंत्राटदार व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बांधकाम संथगतीने होत असल्याने प्रसूतिगृहाच्या इमारतीतील होत असलेल्या उपचारांमुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बेंबाळ व परिसरातील गावांत कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, उपचारांसाठी शहरातील रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने या कठीण परिस्थितीत सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असते, तर ग्रामीण रुग्णांना ती आधार ठरली असती, असे पवन निलमवार यांनी म्हटले आहे.