कोरोना संसर्गावर नियंत्रण करणे व प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व कार्यालय प्रमुख व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहिती घेऊन त्यापैकी संशयितांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. खासगी रुग्णालयांना नियमित भेटी देणे, सौम्य व अतिसौम्य लक्षणे असलेल्या बाधित किंवा संशयित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी गृह विलगीकरण व अलगीकरणाची परवानगी घेऊन नियमांचे पालन केले जाते किंवा नाही, याचीही तपासणी सोमवारपासून सुरू केली जाणार आहे.
पाचपेक्षा जास्त ग्राहकांवर बंदी
भाजीपाला मार्केट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, सर्व दुकानदार, कर्मचारी व विक्रेत्यांना मास्क लावणे बंधनकारक आहे. दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर उपलब्ध नसल्यास आणि एकावेळी केवळ पाचपेक्षा जास्त ग्राहक असल्यास कारवाई होणार आहे.
अन्यथा कारवाईचा बडगा
शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावा, हात स्वच्छ करण्यासाठी साबण व सॅनिटायझर वापरावे, मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या फिरत्या पथकाकडून दंड आकारणी आकारण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.