एसडीओंमार्फत पंतप्रधानांना निवेदन
ब्रम्हपुरी : शेतकरी विरोधात पारित करण्यात आलेले विधेयक मागे घेण्यात यावे, यासाठी अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीच्या वतीने दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलन दडपून टाकण्याचा भाजप सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने निदर्शने करून दिल्ली येथील किसान आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात आली. त्या अनुषंगाने ब्रम्हपुरी येथे किसान कामगार नेते विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात एसडीओ मार्फत पंतप्रधानांना निवेदन देऊन शेतकरी विरोधात पारित करण्यात आलेले कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी निवेदन देताना राजेश खरकाटे, अनिल कांबळी, रमेश तलमले, विनोद राऊत, मिलिंद मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.