जनावरांच्या मालकांवर होणार फौजदारी कारवाई, मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम

By साईनाथ कुचनकार | Published: August 17, 2023 07:53 PM2023-08-17T19:53:22+5:302023-08-17T19:53:45+5:30

मनपा ॲक्शन मोडवर

Criminal action will be taken against animal owners, drive to catch stray animals | जनावरांच्या मालकांवर होणार फौजदारी कारवाई, मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम

जनावरांच्या मालकांवर होणार फौजदारी कारवाई, मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम

googlenewsNext

चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, आता जनावरांना मोकाट ठेऊन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिले आहे.

शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे. समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात, मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन दिल्या जाते.

त्यामुळे आयुक्त विपीन पालीवाल यांनी यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांचा योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा सरळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे. याकरीता मनपाच्या उपद्रव शोध पथकांची यावर नजर राहणार असुन सातत्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांची नोंद घेऊन त्यावर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Criminal action will be taken against animal owners, drive to catch stray animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.