भद्रावती : परतीच्या पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. पीक पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे शेतीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे रवींद्र शिंदे यांनी केली आहे.
वरोरा-भद्रावती तालुक्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस येत आहे. या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. शेतात पावसाचे पाणी जमा झाले असून, सोयाबीन व इतर पीक पाण्याखाली गेले आहे. पाण्याने सोयाबीन शेंगा खराब झाल्या असून, सडत आहेत. याची प्रत्यक्ष पाहणी प्रशासनाने करावी व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आहे.
240921\img-20210924-wa0037.jpg
परतीच्या पावसाने सोयाबीन व ईतर पिकांचे नुकसान
पंचनामा करुन शेतक-यांना नुकसान भरपाई दया.