डेरा आंदोलनाला शिष्टमंडळाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:43 AM2021-02-23T04:43:10+5:302021-02-23T04:43:10+5:30
यावेळी शासनाने सर्व कामगारांचे थकीत पगार जमा करण्याचे निर्देश अधिष्ठाता कार्यालयाला दिलेले असून, पुढील १० दिवसांमध्ये कामगारांच्या खात्यामध्ये पगार ...
यावेळी शासनाने सर्व कामगारांचे थकीत पगार जमा करण्याचे निर्देश अधिष्ठाता कार्यालयाला दिलेले असून, पुढील १० दिवसांमध्ये कामगारांच्या खात्यामध्ये पगार जमा होण्याची शक्यता असल्याचे तोंडी आश्वासन अधिष्ठाता डाॅ. हुमणे यांनी आंदोलकांना दिले. यावर आजपर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने थकीत पगार व किमान वेतनाबाबत अनेकवेळा तोंडी व लेखी आश्वासन देऊनही त्यांची पूर्तता केलेली नाही. कामगारांच्या खात्यामध्ये थेट पगार जमा करण्यासाठी कोषागार विभागाने शासनाकडून केवळ चार ओळींची परवानगी मागितली आहे. परंतु, वैद्यकीय शिक्षण विभागाने तीन महिन्यांत परवानगी मिळविण्यासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे थकीत पगार व किमान वेतनाबाबत ठोस कार्यवाही झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्या कामगारांनी घेतलेली आहे.बॉक्स
कोरोनाची लस घेण्याचे आवाहन
‘थकीत पगार देणार नाही, तोपर्यंत कोरोनाची लस घेणार नाही’, अशी भूमिका घेऊन ५०० कोविड योद्धा कामगारांनी महिन्याभरापूर्वी असहकार आंदोलन छेडले होते. कामगारांच्या या असहकार आंदोलनामुळे अधिष्ठाता कार्यालयाची पंचाईत झालेली आहे. केंद्रीय स्तरावर लस घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोठा पूर्ण झाल्याची माहिती पाठविण्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाला अडचण निर्माण होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्याच्या कार्यक्रमाची मुदत संपत असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने कंत्राटी कामगार लसीच्या डोज पासून वंचित राहणे योग्य नाही, अशी भावना व्यक्त करून डॉ. सुरपाम यांनी सर्व कामगारांना विहित मुदतीत लस घेण्याचे आवाहन केले. यावर सर्व कामगारांशी चर्चा करून भूमिका जाहीर करण्याचे आश्वासन जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाला दिले.