डेरा आंदोलनाला ३० दिवस पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:29 AM2021-03-10T04:29:27+5:302021-03-10T04:29:27+5:30

चंद्रपूर: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या डेरा आंदोलनाला ३० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनपर्यंत सात महिन्यांचा थकीत पगार कोविड ...

Dera movement completes 30 days | डेरा आंदोलनाला ३० दिवस पूर्ण

डेरा आंदोलनाला ३० दिवस पूर्ण

Next

चंद्रपूर: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या डेरा आंदोलनाला ३० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनपर्यंत सात महिन्यांचा थकीत पगार कोविड योद्धे कामगारांच्या खात्यावर जमा झालेला नाही. नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात वैद्यकीय महाविद्यालय व वैद्यकीय शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे.

शासनाने कामगारांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याची परवानगी देऊन डेरा आंदोलकांचा प्रश्न तातडीने सोडवावा, यासाठी आता जिल्ह्यातील अनेक संघटना कोविड योद्धा कंत्राटी कामगारांच्या समर्थनार्थ तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहे. त्यामुळे होणाऱ्या परिणामाला शासन जबाबदार राहील, असे असा इशारा जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष देशमुख यांनी दिला.

नुकतेच या आंदोलनाला दारूमुक्ती कृती समितीचे जिल्हाध्यक्ष विजय चिताडे, उपाध्यक्ष आन्याजी ढवस, सचिव दयाराम नन्नावरे, सहसचिव देवराव बोबडे, सल्लागार धर्माजी खंगार तसेच चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बोबडे यांच्या नेतृत्वात कार्याध्यक्ष रमेश पायपरे, सचिव राजू साखरकर, मनोज पावडे, प्रशांत दोतुंलवार, उमेश पंधरे व शिवसेना पदाधिकारी भारती दुधानी, संध्या तोहगावकर तसेच श्रमजिवी कोयला कामगार संघर्ष संघाचे अध्यक्ष माज अहमद सिद्दिकी महासचिव ॲड. अब्दुल कलाम कुरेशी अशा विविध संघटनेच्या शिष्टमंडळांनी भेट देऊन समर्थनाचे पत्र जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना दिले.

Web Title: Dera movement completes 30 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.