चंद्रपूर : ‘जीवन कुठून आलो आणि कुठे जाणार याचे स्थळ निश्चित करावे लागेल, तसेच जीवनात धर्म अत्यावश्यक आहे. धर्माचरणाने जीवनात तप केल्यास मोक्षप्राप्ती होते’ हा संदेश संथारा प्रेरिका सत्यासाधना महाराज यांनी जैन भवनातील प्रवचन मालिकेत दिला. याच संदेशाने प्रेरित होऊन योगिता अजय संघवी यांनी गुरुवारी २१ उपवासांचे पचकानवी (सपारोप) केला आहे.
योगिता संघवी यांनी कमी वयात मोठी तपस्या केली. त्यांच्या वडिलांनीही अनुबोधन केले. नऊ उपवासात प्रभा गांधी, ११ उपवासात सुनील खटोड, सुभाष खटोड आणि प्रभा गांधी यांचे सहा उपवास सुरू आहेत. संघाचे अध्यक्ष योगेश भंडारी यांनी तपस्येचे महत्त्व अधोरेखित केले. श्री संघाकडून अभिनंदनपर पत्र देऊन योगिताचा सत्कार करण्यात आला. याच मालिकेत अनेकांच्या घरात पंच तीर्थकरांचा जप सुरू आहे. हा जप मंगलकारी, कल्याणकारी, आनंदकारी व चमत्कारी आधीव्याधी उपाधी देणारा आहे. त्याद्वारे घराघरांतून नकारात्मक ऊर्जा संपून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. जितेंद्र चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या जपात बहुसंख्य बंधू-भगिनींनी सहभाग घेतला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जैन समाजासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ५ ते १०, १० ते १५ व १५ ते २० अशा प्रकारचे तीन समूह तयार करण्यात आले. यामध्ये स्वातंत्र्यदिनावर एक मिनिट भाषणाचा कार्यक्रम होईल. बालक-बालिका तिरंगा रंगाचा गणवेश परिधान करून कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.