जि. प. चा अर्थसंकल्प 37 कोटी 83 लाखांच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 05:00 AM2021-03-27T05:00:00+5:302021-03-26T23:30:38+5:30

राज्य शासनाकडून जमीन महसूल उपकर, सापेक्ष अनुदान आणि मुद्रांक कराचा निधी न मिळाल्याने नसल्याने त्याचे परिणाम २०२१-२२ च्या मूळ अंदाजपत्रकावर दिसून आले. अनेक विभागातील निधीला कात्री लावण्याची वेळ पदाधिकारी आणि अधिकाºयांवर आली आहे. अर्थ समितीचे सभापती राजू गायकवाड यांनी १० लक्ष ६ हजार १९४ रूपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. सन २०२०-२१ च्या सुधारित अंदाजपत्रकालाही या सभेत मंजुरी देण्यात आली.

Dist. W. The budget is 37 crore 83 lakhs | जि. प. चा अर्थसंकल्प 37 कोटी 83 लाखांच

जि. प. चा अर्थसंकल्प 37 कोटी 83 लाखांच

googlenewsNext
ठळक मुद्देनिधीअभावी बजेटला कात्री : ग्रामीण विकासाच्या योजना अडचणीत येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आटले असताना शुक्रवारी नियोजन भवनात आयोजित सर्वसाधारण सभेत अर्थ समितीचे सभापती राजू गायकवाड जिल्हा परिषदेचे सन २०२१-२२ चा ३७ कोटी ८३ लक्ष ५ हजार ९९४ रूपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर केला. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार ३७ कोटी ७२ लक्ष ४५ हजार ८०० रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या काही तरतुदींवर सत्ताधारी व विरोधी सदस्यांनीही आक्षेप नोंदविल्याने जि. प. वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता.
राज्य शासनाकडून जमीन महसूल उपकर, सापेक्ष अनुदान आणि मुद्रांक कराचा निधी न मिळाल्याने नसल्याने त्याचे परिणाम २०२१-२२ च्या मूळ अंदाजपत्रकावर दिसून आले. अनेक विभागातील निधीला कात्री लावण्याची वेळ पदाधिकारी आणि अधिकाºयांवर आली आहे. अर्थ समितीचे सभापती राजू गायकवाड यांनी १० लक्ष ६ हजार १९४ रूपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. सन २०२०-२१ च्या सुधारित अंदाजपत्रकालाही या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेचा सन २०२१-२२ चा ३७ कोटी ८३ लक्ष ५ हजार ९९४ रूपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. तरतुदीनुसार ३७ कोटी ७२ लक्ष ४५ हजार ८०० रुपयांचा खर्च गृहित धरण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या उपस्थितीत अर्थ समितीचे सभापती राजू गायकवाड यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सत्ताधार व विरोधी सदस्यांनीही आक्षेप घेतला. सत्ताधारी गटातील जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी शून्य बजेट तर जीवतोडे यांनी खरेदी बजेट असल्याची टीका केली. काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर, चिमूरकर, गजानन बुटके यांनीही अर्थसंकल्पातील तरतुदींवर आक्षेप घेतला.
 

पाणी पुरवठ्यासाठी    १३ कोटी ६३ लाख
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे देखभाल व दुरुस्तीसाठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करण्यात आला. १३ कोटी ६३ लाखांची तरतूद या विभागावर करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागांतर्गत मूल तालुक्यातील सोमनाथ येथे चारा बागेची निर्मिती करण्याकरिता अर्थसंकल्पात प्रथमच १९ लाखांची तरतूद करण्यात आली. 

कृषी व वैयक्तिक लाभाच्या योजना गायब
मालमत्ता परिरक्षण, शिक्षण (५ टक्के), शिक्षण, बाजार   आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, समाजकल्याण अपंग कल्याण निधी, वनमहसूल अनुदान, महिला बालकल्याण, सामाजिक सुरक्षा व कल्याण, कृषी, पशुसंवर्धन, पंचायत राज  व लघु सिंचनावर ३७ कोटी ७२ लाख ४५ हजार ८०० रूपयांचा खर्च अपेक्षित  असल्याचे अर्थसंकल्पात नमुद आहे.

३७ कोटी ८३ लाख उत्पन्नाचा अंदाज
शिक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, वनीकरण, कृषी विषयक कार्यक्रम, पंचायत राज कार्यक्रम आणि लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून ३७ कोटी ८३ लक्ष ५ हजार ९९४ रूपये जमा होण्याचा अंदाज नोंदविण्यात आला.
अर्थसंकल्पात फक्त एकच नवीन योजना
मूळ अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार सोमनाथ येथील चारा बागेची निर्मिती वगळल्यास कोणत्याही नवीन योजना राबविल्या जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे शासनाकडून निधी मिळत नसल्याने पदाधिकारी व अधिकाऱ्यांची नियोजनासाठी तारांबळ उडणार आहे.

Web Title: Dist. W. The budget is 37 crore 83 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.