दिव्यांगांना अन्नधान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:51 AM2021-02-18T04:51:20+5:302021-02-18T04:51:20+5:30
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश पेंदोर, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, ग्राम विकास अधिकारी पंढरी गेडाम, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप, प्रमोद खिरटकर, ...
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश पेंदोर, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, ग्राम विकास अधिकारी पंढरी गेडाम, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप, प्रमोद खिरटकर, आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते. याआधी करोना काळातही गावातील दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीमार्फत अन्नधान्य वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. वेळोवेळी अपंग व्यक्तींना ग्रामपंचायत सहकार्य करीत असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गावातील दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या योजनांचा लाभ देता यावा यासाठी ग्रामपंचायतीमार्फत प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले यांनी सांगितले, तर गावातील जनतेने करवसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी ग्राम विस्तार अधिकारी पंढरी गेडाम यांनी केले. गावातील कर वसुली झाल्यास गावातील नागरिकांना मोठ्या सुविधा व दिव्यांग व्यक्तींनासुद्धा चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे ही ते म्हणाले. धान्याच्या किटमध्ये तांदूळ, गहू, तेल, साखर, डाळ, निरमा, मीठ, हळद, चहा पत्ती, आदी वस्तूंचा समावेश आहे.