आयएएस अधिकाऱ्याची विनम्रता : येनोली येथील शिक्षक व विद्यार्थी भारावलेनागभीड : जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी या तालुक्यातील योनोली या दुर्गम भागातील जि.प. शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी घेतलेल्या ‘या’ वर्गाने येनोली येथील विद्यार्थी व शिक्षकच नव्हे तर ग्रामस्थही भारावून गेले.एरवि आय.ए.एस. अधिकारी म्हटले की, त्यांचा थाटच निराळा असतो. वातानुकुल कार्यालय आणि वातानुकुल गाडी हेच त्यांचे जग असते. या जगातूनच त्यांचा कारभार सुरू असतो. पण या जगाला बाजूला सारून सलिल यांनी ग्रामीण जनतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असाच आहे.या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी या तालुक्यातील येनोली या दुर्गम भागातील छोट्या गावात जाऊन तेथील शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळले. त्यांचेशी एकरूप झाले. त्यांची विचारपूस केली. त्यांनी शाळेच्या व अभ्यासाचे विविध प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले. या विद्यार्थ्यांनी आपआपल्या बुद्धीप्रमाणे प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्नही केला. शाळेच्या मुख्याध्यापकांनाही त्यांनी काही प्रश्न विचारले व अडचणी विचारल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी उमेश काळे, डी.एफ.ओ. आशिष ठाकरे, तहसीलदार समीर माने, सहायक संवर्ग विकास अधिकारी बारापात्रे, नायब तहसीलदार पी.आर. गावंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. हा वर्ग जवळपास १५ ते २० मिनिटे चालला. (तालुका प्रतिनिधी)जिल्हाधिकारी यांनी आस्थेपोटी विद्यार्थ्यांची चौकशी केली ती गावकऱ्यांना सुखावून गेली. शासकीय दौऱ्याचे निमित्ताने का होईना पण त्यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली.- अमोल बावणकर, ग्रामस्थ
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विद्यार्थ्यांचा ‘क्लास’
By admin | Published: July 31, 2016 12:49 AM