दिवाळीची खरेदी दणक्यात; 400 कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 05:00 AM2021-11-07T05:00:00+5:302021-11-07T05:00:38+5:30

कोरोनामुळे दोन वर्षांपासून बाजारपेठाची स्थिती अतिशय वाईट झाली होती. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मोठे, मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योगांना टाळे लागले. जीवनावश्यक वस्तु खरेदीच्याप बाजारपेठाची रया गेली. कोरोना संसर्गाची स्थिती ओसरल्याने यंदा व्यावसायिकांनी भांडवल गुंतवून नवीन माल भरला तर नागरिकांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी लगबग केली. खरेदीमुळे चंद्रपुरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेला आहे. लहान- मोठी दुकानांवरही ग्राहक दिसून येत आहेत.

Diwali shopping bumps up; 400 crore turnover | दिवाळीची खरेदी दणक्यात; 400 कोटींची उलाढाल

दिवाळीची खरेदी दणक्यात; 400 कोटींची उलाढाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ऐन दिवाळीतच कोरोना ओसरू लागल्याने यंदा नागरिकांनी दणक्यात खरेदी केली. परिणामी, बाजाराने उसळीने घेतली असून आठवडाभरात चंद्रपूर व जिल्ह्यात सुमारे ४०० काेटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. पुढील आठवडाभर खरेदीचा माहोल कायम राहिल्यास ही उलाढाल एक हजार कोटींच्या घरात जाऊ शकते.
कोरोनामुळे दोन वर्षांपासून बाजारपेठाची स्थिती अतिशय वाईट झाली होती. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मोठे, मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योगांना टाळे लागले. जीवनावश्यक वस्तु खरेदीच्याप बाजारपेठाची रया गेली. कोरोना संसर्गाची स्थिती ओसरल्याने यंदा व्यावसायिकांनी भांडवल गुंतवून नवीन माल भरला तर नागरिकांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी लगबग केली. खरेदीमुळे चंद्रपुरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेला आहे. लहान- मोठी दुकानांवरही ग्राहक दिसून येत आहेत. नोकरदारांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांनीही तालुकास्थळावरील बाजारात येऊन वस्तुंची खरेदी केली. गतवर्षी बोनसचा पत्ता नव्हता. यंदा नोकरदार व कामगारांच्या हातात दिवाळीपूर्वीच बोनस पडल्याने बाजारात चैतन्य दिसून आले. यंदाच्या दिवाळीला प्रत्येकानेच कपडे, इलेक्ट्रानिक्स व अन्य जीवनावश्यक वस्तु खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे या आठवडभरात चंद्रपुरात सुमारे २०० कोटी तर जिल्ह्यात २०० कोटी असे एकूण ४०० कोटींची उलाढाल झाल्याची शक्यता आहे. दिवाळीची खरेदी अजुनही सुरूच असल्याने ही उलाढाल पुन्हा वाढणार आहे.
 

दागिने खरेदीत २० टक्क्यांनी वाढ

- चंद्रपुरातील सराफा बाजारात गत वर्षीच्या तुलनेत यंदा सोने व चांदी खरेदीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 
- कोरोनाने जोरदार फटका बसला होता. सध्या तरी व्यापारी वर्गात उत्साह आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर ५० हजारांवर जाऊन पोहचले होते. मात्र, आता सोन्याचे दर हे ३०० रुपयांनी कमी झाले. 
- शुद्ध सोन्याचे दर हे ४९ हजार ७०० वर आले आहे. २२ कॅरेट सोन्याचे दर ४५ हजार ७०० आहे. मात्र, चांदीचे दर वाढले आहे. 
- आठवडाभरापूर्वी चांदीचे दर ६५ हजारांवर होते. त्यामध्ये वाढ होऊन ६९ हजार रूपये झाली आहे.
 

कोरोनाच्या संकटातून बाहेर निघत असताना यंदाची दिवाळी बऱ्यापैकी उत्साहात साजरी होत आहे. खरेदीमुळे उलाढालही वाढली. बाजारात पैसा आला तरच अर्थव्यवस्थेला तेजी येईल.   बाजाराची स्थिती १०० टक्के बदलायला बराच वेळ आहे. मात्र, त्यादृष्टीने वाटचाल सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
- सदानंद खत्री, 
अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ, चंद्रपूर

फटाक्यांचीही बंपर विक्री
गतवर्षीपासून फटाका बाजार बंद होता. यंदा चंद्रपुरातील कोनेरी तलाव व बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील बाजारात फटाक्यांचीही बंपर विक्री झाली. नागरिकांनी स्वदेशी आकाश कंदील खरेदीला पसंती दिल्याचे दिसून आले. 
कमळाच्या फुलासारखा आकार आणि त्यावर लक्ष्मीचे चित्र असलेले कमळ 
आकाश कंदील, फोमचे आकाश कंदील, मेटल कंदील, फायबर कंदील, गोल कंदील, आनार कंदील, लाकडी झोपडीचा कंदील, कागदी कंदील अशा वेगवेगळ्या आकर्षक कंदिलांच्या विक्रीने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

 

Web Title: Diwali shopping bumps up; 400 crore turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.