कापूस पिकातील डोमकळीचे करा व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:32 AM2021-08-13T04:32:20+5:302021-08-13T04:32:20+5:30

चंद्रपूर : अंड्यातून बाहेर पडलेली अळी कळीमध्ये प्रवेश करते व आतील भाग पोखरते. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कळीचे नुकसान झाल्यामुळे ...

Domestic management of cotton crop | कापूस पिकातील डोमकळीचे करा व्यवस्थापन

कापूस पिकातील डोमकळीचे करा व्यवस्थापन

Next

चंद्रपूर : अंड्यातून बाहेर पडलेली अळी कळीमध्ये प्रवेश करते व आतील भाग पोखरते. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कळीचे नुकसान झाल्यामुळे फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. यालाच डोमकळी म्हणतात. त्यामुळे डोमकळीचा वेळीच नायनाट करून नुकसान टाळा, असा सल्ला कृषी विभाागाने दिला आहे.

पहिल्या अवस्थेतील गुलाबी बोंडअळी फुलांमध्ये शिरते, पाकळ्यांना लाळेद्वारे एकमेकांना जोडून स्वतःला स्वरक्षणासाठी बंद करून घेते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अशा कळ्या म्हणजेच डोमकळ्या आहेत, हे ओळखा. फुलांमध्ये सर्वप्रथम गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. अंड्यातून निघालेली अळी ताबडतोब पाते, कळ्या, फुले यांना छिद्र करून आतमध्ये शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुलांचे डोमकळीत रूपांतर करते. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव १० दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या कळीमध्ये झाल्यास झाडावरून कळी गळून पडते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.

कापूस पिकातील डोमकळ्या वेळीच नष्ट न केल्यास यातील गुलाबी बोंडअळीची दुसरी पिढी तयार होऊन, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतो व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी कापूस पिकातील डोमकळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

Web Title: Domestic management of cotton crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.