रस्ता प्रदूषणाला वाहनचालकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:00 AM2020-09-30T05:00:00+5:302020-09-30T05:00:06+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष श्रीनिवास गोसकुला यांच्या नेतृत्वात एक तास हे आंदोलन करून संताप व्यक्त केला. या रस्त्याने रात्रंदिवस पैनगंगा, मुंगोली, कोलगाव कोळसा खाण ते घुग्घुस रेल्वे सायडिंगपर्यत कोळसा वाहतूक होत असते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. रस्त्यावर टँकरने पाणी मारण्यासाठी वेकोलिने कंपनीचे व खासगी पाणी टँकर लावले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : वेकोलिच्या पैनगंगा ते घुग्घुस रेल्वे सायडिंगपर्यत कोळसा वाहतूक करणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले व रात्रंदिवस चालत असलेल्या वाहनाच्या वर्दळीमुळे मोठया प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने वाहन चालकाच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. वारंवार या गंभीर प्रकरणाबाबत व्यवस्थापनाचे लक्ष वेधून खड्डे बुजविणे व रस्त्यावर टँकरने पाणी टाकण्याची मागणी केली. मात्र वेकोलिने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे वाहनचालकांनी संतापून मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष श्रीनिवास गोसकुला यांच्या नेतृत्वात एक तास हे आंदोलन करून संताप व्यक्त केला. या रस्त्याने रात्रंदिवस पैनगंगा, मुंगोली, कोलगाव कोळसा खाण ते घुग्घुस रेल्वे सायडिंगपर्यत कोळसा वाहतूक होत असते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. रस्त्यावर टँकरने पाणी मारण्यासाठी वेकोलिने कंपनीचे व खासगी पाणी टँकर लावले आहे. मात्र पाणी टँकरच्या माध्यमातून पाणी मारण्यात येत नसल्याचे रस्त्यावरून कोळसा वाहनाच्या वर्दळीने मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असते. नेहमी अपघात होतात. या गंभीर बाबीकडे वारंवार वाहन चालकांनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधून खड्डे बुझविण्याची व प्रदूषण नियंत्रण करण्यासंदर्भात रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी केली. मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी सायंकाळी रस्ता रोको आंदोलन केले. दरम्यान व्यवस्थापकांनी खडे बुजविण्याचे व पाणी टँकरने पाणी टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.