जयंत जेनेकर।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कोरपना येथे १९९६ ला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीचे काही वर्ष भाड्याच्या इमारतीत काढल्यानंतर या ठिकाणी प्रशस्त वास्तू उभारण्यात आली. मात्र येथील रिक्त पदांचा अनुशेष अजूनही कायम आहे.या ठिकाणी १८ पदे मंजूर असून यातील केवळ ११ पदे भरण्यात आली आहे. सात पदाचा अनुशेष आजही कायम आहे. यामध्ये एक कनिष्ठ लिपिक, दोन शिल्प निदेशक, तीन शिल्पनिदेशक कंत्राटी, एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी ही पदे रिक्त आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनाही अध्यापनात अडचणी येत असून एकाच कर्मचाऱ्यावर दोन पदाचा भार येऊन ठेपला आहे. याचा सर्व फटका मात्र विद्यार्थ्यांना बसतो आहे. येथे सद्यस्थितीत पाच ट्रेड असून यामध्ये वेल्डर, फिटर, डिझेल, वायर मन, ड्रेस मेकिंग आदींचा समावेश आहे. या ठिकाणी कोपा, रिफ्रीजेटर अॅन्ड एअर कंडीशन, मोटर मेकॅनिक आदी अभसाक्रमाचे ट्रेड सुरू होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण संस्थेतील दोन वॉटर कुलर, जनरेटर तांत्रिक कारणास्तव गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच येथे मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने परिसरातील बगिचा पूर्णत: नष्ट झाला आहे. यासाठी येथे नवीन कूपनलिका खोदण्याची नितांत आवश्यकता आहे. येथील कर्मचाऱ्यांना येथे सदनिका उपलब्ध नसल्याने ९५ टक्के कर्मचारी इतरत्र ठिकाणावरून अपडाऊन करणे पसंत करतात. या ठिकाणी कर्मचारी स्थानिक रहिवासी राहत नसल्यामुळे संस्थेबाबतचा जिव्हाळा येथील कार्यरत कर्मचाºयांना कमीच दिसून येतो. त्याचाही परिणाम संस्थेच्या विकासात जाणवत आहे. सदर संस्थेचा परिसर विस्तीर्ण असल्याने येथे कर्मचारी सदनिका उभारल्यास कर्मचाºयांच्या दृष्टीनेसुद्धा सोयीचे होईल. याशिवाय बागबगिचे तयार करून त्याची उत्कृष्ट देखभाल करणे आवश्यक आहे.प्रवेशद्वार नाम फलकाविनाऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या अनेक वर्षांंपासून दिव्य कमान बांधून प्रवेशद्वार बांधण्यात आले. मात्र सदर प्रवेशद्वारावर आजही नाम फलक लावण्यात आले नाही. उलट त्याच्या शेजारी साधा फलक लावून संस्थेचे नाव रेखांकित केले आहे. त्यामुळे दिव्य प्रवेशद्वारावर कमान असताना तेथे रंगरंगोटी न करता फलक लावण्यात आल्याने संस्थेच्या प्रशस्त वस्तूला सौंदर्य दृष्टीने नख लागत आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही रिक्त पदाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:55 PM
कोरपना येथे १९९६ ला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीचे काही वर्ष भाड्याच्या इमारतीत काढल्यानंतर या ठिकाणी प्रशस्त वास्तू उभारण्यात आली. मात्र येथील रिक्त पदांचा अनुशेष अजूनही कायम आहे.
ठळक मुद्देजनरेटरही नादुरुस्तच : पाण्याअभावी बगिचा नावालाच उरला