भेजगाव परिसरात विजेचा लपंडाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:36 PM2019-06-29T22:36:17+5:302019-06-29T22:36:51+5:30

मूल तालुक्यातील भेजगाव परिसरात मागील अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहे. विद्युत कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने पुरवठा सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे नागरिकांना अंधरात दिवस काढवा लागतो.

Electricity halted in Bhejgaon area | भेजगाव परिसरात विजेचा लपंडाव सुरूच

भेजगाव परिसरात विजेचा लपंडाव सुरूच

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । नागरिकांना करावा लागतो अडचणींचा सामना, व्यावसायिकांनाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव परिसरात मागील अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहे. विद्युत कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने पुरवठा सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे नागरिकांना अंधरात दिवस काढवा लागतो.
भेजगाव परिसरात चिचाळामार्गे मूलवरुन विद्युत पुरवठा होतो. या परिसरात जवळपास २० गावे आहेत. मात्र मूल शिवाय कुठेही दुसरे विद्युत केंद्र नाही. सद्यास्थितीत पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. वातावरणात थोडातरी बदल झाल्यास विद्युत पुरवठा दिवसभरासाठी किंवा रात्रभरासाठी खंडित होतो. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. तरे विजेचे चालणारी व्यावसायिकांना मोठा फटका बसतो.
अनेकदा विद्युत वितरण कंपणीच्या धोरणामुळे कमी दाबाचा विद्युत पुरवठा होतो. परिणामी घरघुती उपकरणे, कृषीपंप निकामी ठरत असल्याची बोंब शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यासोबतच व्यावसायिकांची झेराक्स मशिन, नेटकॅफेमधील संगणक, आटाचक्की, घरघुती उपकरणामध्ये बिघाड होत आहे. येथील विद्युत विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यांना विद्युत पुरवठ्याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे त्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, तसेच विद्युतपुरवठा नियमीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
३३ केव्ही उपकेंद्राची मागणी
भेजगाव परिसरात मूलवरुन विद्युत पुरवठा करण्यात येतो. मात्र या परिसरात पुरेसा विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे अनेकांची उपकरणामध्ये बिघाड होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपात बिघाड होऊन मोठे आर्थिक नुकसना झाले आहे. भेजगाव हे मूल तालुक्यातील मध्यवर्ती केंद्रस्थान असल्याने या ठिकाणी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र सुरु करुन परिसरात विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. जर या परिसरात विद्युत उपकेंद्र झाल्यास परिसरातील नागरिकांना सोईचे होणार आहे. त्यामुळे भेजगाव येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र सुरु करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी
सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र भेजगाव परिसरातील विद्युत कर्मचारी मूलवरुन अपडाऊन करतात. परिणामी विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर संबंधित कर्मचारी मूलवरुन येऊन दुरुस्ती करण्यापर्यंत वाट पहावी लागते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागते. त्यामुळे सर्व कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Electricity halted in Bhejgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.