सावली तालुक्यात प्रतिदिन १० हजार मजुरांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:30 AM2021-02-24T04:30:46+5:302021-02-24T04:30:46+5:30
यावेळी तहसीलदार परिक्षित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, नगर परिषदच्या मुख्याधिकारी मनिषा वजाडे, वन अधिकारी वसंत कांबळे, विस्तार ...
यावेळी तहसीलदार परिक्षित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, नगर परिषदच्या मुख्याधिकारी मनिषा वजाडे, वन अधिकारी वसंत कांबळे, विस्तार अधिकारी अनिरूद्ध वाडके, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता सुधीर राऊत, विलास चांदेकर, मनसुखलाल बोंगले आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, सावली येथे दररोज २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी अखंडित वीज उपलब्ध व्हावी म्हणून एक्सप्रेस फीडरसाठी दोन कोटी मंजूर केले. बांधकाम विभागाची प्रशासकीय इमारत व आरोग्य विभाग, भूमी अभिलेख व बांधकाम कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थान बांधकामासाठी १३. ५ कोटी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी ५. ५ कोटी मंजूर करण्यात आले स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाकरिता ई-लायब्ररी सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तहसीलदार पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा आढावा सादर केला. मास्क न वापरणे व कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांकडून चार दिवसात २७ हजारांचा रुपये दंड वसूल केल्याची माहिती दिली.
आसोलामेंढात ताजमहलची प्रतिकृती
आसोलामेंढा येथे पर्यटन केंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सर्व सुविधायुक्त ५० कॉटेज, हॉल, बोटींग सुविधा, आयफेल टॉवर, लाल किल्ला व ताजमहलच्या फायबर प्रतिकृती बसविण्यात येणार आण्त. यातून किमान ५०० स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येत्या काही वर्षांत सावली तालुका पर्यटनाच्या नकाशावर आणू, अशी ग्वाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.