चंद्रपुरातील खुल्या जागांना अतिक्रमणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:24 AM2021-01-15T04:24:00+5:302021-01-15T04:24:00+5:30
१३ मार्च २०१८ ला स्थायी समितीच्या अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेने खुल्या जागांचा विकास करण्यासाठी मनपाने विकास आराखडा मांडला होता. शहरातील ...
१३ मार्च २०१८ ला स्थायी समितीच्या अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेने खुल्या जागांचा विकास करण्यासाठी मनपाने विकास आराखडा मांडला होता. शहरातील वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम करण्यासाठी शेकडो नागरिकांनी अर्ज केले. या बांधकामामुळे महानगरपालिकेला शुल्क मिळाले. या वर्षात २ कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याची अपेक्षा मनपाला होती, परंतु शहरातील विविध वाॅर्डांमध्ये नागरिकांनी अतिक्रमण केले. हे अतिक्रमण काढण्यासाठी मनपाने पावले उचलली नाहीत. नवीन बगीचा निर्माण व अस्तित्वात असलेला बगिचा विकास करण्यासाठी दीड कोटीची तरतूद अर्थसंकल्पात होती; मात्र शहरातील अनेक बगिचांच्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते.
बाजाराचा पुनर्विकास थंडबस्त्यात
बंगाली कॅम्प तसेच बिनबा मासळी बाजाराचा पुनर्विकास करण्यासाठी केंद्र शासनाकडून मदत मागण्यात आली. हा प्रश्नही मार्गी लागला नाही. शहराचा दरवर्षी विस्तार होत असताना अतिक्रमणाची प्रकरणे वाढत आहेत. शिवाय, विकास योजना आराखडा व भूसंपादनाबाबत प्रशासनाची गतिमानता दिसून येत नाही. शहरातील विविध वॉर्डांतील उद्यानांचा विकास आराखडाही कागदावरच राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.