वाघाच्या बंदोबस्तासाठी समन्वयक समिती स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 05:00 AM2022-02-21T05:00:00+5:302022-02-21T05:00:44+5:30

जिल्ह्यातील जंगलाचा परिसर हा दिवसेंदिवस कमी होत असून नागरिकांचा परिसर वाढत आहे. याठिकाणी इंडस्ट्रीज सुद्धा आहे. त्यामुळे वाघांना या ठिकाणी प्रवेश करणे सोपे जाते. त्यामुळे वन्यप्राणी बफर क्षेत्र ओलांडून या परिसरात येऊ नयेत याची काळजी घ्यावी. तत्पूर्वी ऊर्जामंत्र्यांनी ऊर्जानगर परिसरातील घटनास्थळाची पाहणी केली. 

Establish a coordinating committee for tiger management | वाघाच्या बंदोबस्तासाठी समन्वयक समिती स्थापन करा

वाघाच्या बंदोबस्तासाठी समन्वयक समिती स्थापन करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ऊर्जानगर परिसरात मोठ्या प्रमाणात गवत, झुडपे, काटेरी वनस्पती आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना लपण्याची जागा असल्याने वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे हे वन्यप्राणी शिकारीकडे वळतात. या परिसरातील खुरपे, झाडे-झुडपे नष्ट करून परिसराची स्वच्छता राखावी. बफर झोनमधील वाघ शहरात येणार नाही यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्या, अशा सूचना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी  दिल्या.
हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे सुरक्षा उपाययोजनेसाठी  आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य अभियंता पंकज सपाटे, महावितरणचे मुख्य अभियंता  सुनील देशपांडे,  मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, संचालक प्रशांत खाडे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता एन.व्ही. किरोलीकर, सुहास जाधव इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे, वनविभागाचे तसेच ऊर्जानिर्मितीचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यातील जंगलाचा परिसर हा दिवसेंदिवस कमी होत असून नागरिकांचा परिसर वाढत आहे. याठिकाणी इंडस्ट्रीज सुद्धा आहे. त्यामुळे वाघांना या ठिकाणी प्रवेश करणे सोपे जाते. त्यामुळे वन्यप्राणी बफर क्षेत्र ओलांडून या परिसरात येऊ नयेत याची काळजी घ्यावी. तत्पूर्वी ऊर्जामंत्र्यांनी ऊर्जानगर परिसरातील घटनास्थळाची पाहणी केली. 

या सुचविल्या उपाययोजना
- शक्य होत असल्यास वाघांना काॅलर आयडी लावावा.
- वाघांना ट्रॅप करण्यासाठी कॅमेरे लावावेत. 
- रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करावी. 
- सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नेमावी
- इंडस्ट्रीज परिसरात सिक्युरिटी टाॅवर उभारावेत.
- ऊर्जानिर्मितीने कर्मचाऱ्यांना जाण्या-येण्यासाठी चारचाकी वाहनांची उपलब्धता करून द्यावी.

 

Web Title: Establish a coordinating committee for tiger management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.