जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गंभीर रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. अशा वेळी व्हेंटिलेटर्सची गरज पडते. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यात व्हेंटिलेटर्सची कमतरता होती. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास अडचण येत होती. अनेकदा रुग्णांना व्हेंटिलेटर्ससाठी धावपळ करावी लागत होती. त्यामुळे पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर्सची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाला १५ व्हेटिलेटर्स आणि शल्य चिकित्सक कार्यालयाला २० व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यात आला. शल्य चिकित्सक कार्यालयांनी गरजेच्या ठिकाणी व्हेंटिलेटर्स पाठवले. परंतु, या व्हेंटिलेटर्समध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने हे व्हेंटिलेटर्स हाताळण्यासाठी तज्ज्ञाची गरज भासत आहे. हे व्हेंटिलेटर्स उपचारादरम्यान बंद पडत असल्याच्याही तक्रारी येत आहेत.
-----
पीएम केअर फंडातून ३५ व्हेंटिलेटर्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १५ व्हेंटिलेटर्स जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय, १० राजुरा उपजिल्हा रुग्णालय, वरोरा व चिमूर उपजिल्हा रुग्णालयाला प्रत्येकी पाच व्हेंटिलेटर्स देण्यात आले असून रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- डॉ. निवृत्ती राठोड, शल्य चिकित्सक, चंद्रपूर
बॉक्स
कोविड सेंटरमध्ये हवेत ऑक्सिजन बेड
उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी ऑक्सिजन बेडची संख्या मुबलक प्रमाणात राहिली तर जिल्ह्याच्या ठिकाणी उपचाराचा लोड वाढणार नाही. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होईल.