शेतकरी विधेयकाच्या विरोधात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:56 AM2020-12-04T04:56:02+5:302020-12-04T04:56:02+5:30

नागभीड : शेतकरी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून नागभीड येथे तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने धरणे ...

Farmers protest against the bill | शेतकरी विधेयकाच्या विरोधात धरणे आंदोलन

शेतकरी विधेयकाच्या विरोधात धरणे आंदोलन

Next

नागभीड : शेतकरी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून नागभीड येथे तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

तालुका काँग्रेस कमेटीच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, महिला आघाडीच्या अध्यक्ष जोत्सना वारजुकर, जि.प.सदस्या नयना गेडाम, पं.स.माजी सभापती प्रणया गड्डमवार, माजी उपसभापती रवी देशमुख, नागभीडचे माजी सरपंच रवींद्र कावळे, किशोर समर्थ, नगरसेविका धनश्री काटेखाये, सारिका धारणे, नगरसेवक प्रतिक भसीन, संजय अमृतकर, अमोल वानखेडे, रमेश ठाकरे, कोटगावचे माजी सरपंच यशवंत भेंडारकर,संजय माकोडे हरीश मुळे आदींसह अनेकांची उपस्थिती होती. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Farmers protest against the bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.