शेतकरी, शेतमजुरांची एसडीओ कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:33 PM2018-03-28T23:33:14+5:302018-03-28T23:33:14+5:30
शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो मजूर, शेतकरी सहभागी झाले होते.
आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो मजूर, शेतकरी सहभागी झाले होते.
ब्रह्मपुरी येथील हुतात्मा स्मारक येथून दुपारी १ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. किसान सभेचे राष्टÑीय नेते महेश कोपूलवार, अरुण वनकर, विनोद झोडगे, नामदेव नखाडेते, मिलिंद भनारे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर जनविरोधी धोरणाच्या विरोधात शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
अतिक्रमणधारक शेतकºयांना पट्टे द्यावे, निराधारांच्या अनुदानात वाढ करावी आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांच्या मार्फत मुख्यमंत्री, वनमंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकाºयांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार अडेपवार व अन्नपुरवठा अधिकारी राऊत यांच्याशी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. मोर्चा दरम्यान किसान सभेचे राष्टÑीय परिषद सदस्य डॉ. महेश कोपूलवार, अरुण वनकर यांनी संबोधित केले. मागण्या मान्य न झाल्यास येत्या ९ एप्रिल रोजी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयावर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील शेतकºयांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.