अखेर कोरोना प्रतिबंधाचे २० हजार लस चंद्रपुरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:32 AM2021-01-16T04:32:09+5:302021-01-16T04:32:09+5:30
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम व जिल्हा पीएचएन नर्स छाया पाटील, ...
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम व जिल्हा पीएचएन नर्स छाया पाटील, शिततंत्रज्ञ स्वप्निल कांबळी, आरोग्य विभागाच्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून शीत वाहनाचे स्वागत केले. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने तयार केली आहे. २० हजार लसीचे डोज जिल्हा परिषद विभागाच्या औषधी भांडार कक्षात ठेवण्यात आल्या आहेत. ही लस गुरुवारी सहा केंद्रावर वितरित करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलाेत यांनी सांगितले. लस प्राप्त होताच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. गेडाम व अधिकारी उपस्थित होते
जिल्ह्यातील सहा केंद्रावर लसीकरण होणार आहे. यात चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर व पठाणपुरा आरोग्य केंद्र, वरोरा, ब्रम्हपुरी व राजुरा येथील केंद्रांचा समावेश आहे. नऊ हजार लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोज देण्यात येणार आहे. त्याच नऊ हजार लाभार्थ्यांना दुसरा डोज २८ दिवसानंतर देण्यात येईल.
लस पूर्णत: सुरक्षित
कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे. ही लस प्रमाणित व पूर्णत: सुरक्षित आहे. कोरोना लसीकरणाबाबत आढावा घेऊन लसीकरणासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर