...अखेर मासळ येथील दोन्ही जलशुद्धीकरण यंत्रे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:12 AM2021-05-04T04:12:05+5:302021-05-04T04:12:05+5:30
नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती थाबणार : ग्रामपंचायतीने घेतली दखल मासळ ( बु ) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या ...
नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती थाबणार : ग्रामपंचायतीने घेतली दखल
मासळ ( बु ) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या आदर्श ग्रामपंचायत मासळ बु. येथील दोन्ही जलशुद्धीकरण यंत्र मागील काही दिवसांपूर्वी निष्क्रिय झाले होते. विहिरीने तळ गाठला होता. याबाबत ‘लोकमत’ने ४ एप्रिलला मासळ बु. येथे ‘पिण्याच्या पाण्याची टंचाई’ या आशयाखाली वृत्त प्रकाशित करताच ग्रामपंचायतीने दोन खासगी विहिरी अधिग्रहित करून दोन्ही जलशुद्धीकरण यंत्रे सुरू केली.
त्यामुळे आता नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती थांबणार आहे.
आदर्श ग्रामपंचायत मासळ बु.च्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून सन २०१४-२०१५ मध्ये पिण्याचे पाणी मिळावे म्हणून स्थानिक ग्रामपंचायतीच्या प्रांगणात जलशुद्धीकरण संयंत्र बसविले. माजी आमदार मितेश भांगडिया यांच्या स्थानिक विकास निधीतून सन २०१४-२०१५ ला नंदारा रोडवरील अंगणवाडी क्र. ३ जवळ दुसरे जलशुद्धीकरण संयंत्र बसविले. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून जलशुद्धीकरण यंत्राच्या विहिरीने तळ गाठल्याने मागील काही दिवसांपासून दोन्ही जलशुद्धीकरण संयंत्र बंद होते. त्यामुळे नागरिकांना करबडा फाटा, कोलारा फाटा येथून हातपंपाचे पाणी आणावे लागत होते.
अखेर ही समस्या लक्षात घेता व गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती थाबावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने गावालगतच्या विहिरी अधिग्रहित करण्याचा ठराव घेतला. त्यामुळे गावालगत अंगणवाडी क्र. ३ परिसरातील डॉ. देवनाथ गंधारे यांची विहीर अधिग्रहित केली, तर ग्रामपंचायत प्रांगणातील हनुमान मंदिराची बोअर मशीन अधिग्रहित केल्याने आता मासळवासीय जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे.