कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांना अर्थमंत्र्यांचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 09:02 PM2019-08-15T21:02:22+5:302019-08-15T21:06:28+5:30

'या भागातील नुकसानभरपाईसाठी राज्याने केंद्राकडे ६८१२ कोटी रु. मदतीपोटी मागितले आहेत.'

Finance Minister gives relief to flood victims in Kolhapur-Sangli | कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांना अर्थमंत्र्यांचा दिलासा

कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांना अर्थमंत्र्यांचा दिलासा

Next

चंद्रपूर : कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांना जीएसटी सादर करण्यासाठी महिन्याची मुदतवाढ, केंद्राच्या मदतीची वाट न  पाहता राज्य निर्धाराने मदत, वनमंत्रालयातर्फे शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी ८० टक्के अनुदान तसेच डॉ. मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत अनुदान रोजगार निधी दुप्पट करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी येथे दिली.  

राज्यातील कोल्हापूर-सांगली आणि लगतच्या जिल्ह्यात पावसाने थैमान घालून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भागातील नागरिक आणि व्यापारी वर्गासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाच्या घोषणा यावेळी केल्यात. पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जीएसटी सादर करण्यासाठी महिन्याची मुदतवाढ देणार दिली जाणार असून या कालावधीत कोणताही दंड लावला जाणार नाही. 

या भागातील नुकसानभरपाईसाठी राज्याने केंद्राकडे ६८१२ कोटी रु. मदतीपोटी मागितले आहेत. मात्र केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य या नागरिकांना निर्धाराने मदत करणार असल्याचे अर्थमंत्री यावेळी म्हणाले. पूरग्रस्त भागात शेती उध्वस्त झाल्याने वनमंत्रालय शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी ८० टक्के अनुदान देणार असून मनरेगा च्या माध्यमातून देखील बांबू लागवडीसाठी अनुदान दिले जाणार आहे. 

सह्याद्रीसारख्या व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास असलेल्या गावाना प्रायोगिक तत्वावर १०० टक्के अनुदानावर कुंपण उपलब्ध करून दिले जाणार आहे याशिवाय पूरग्रस्त  भागात रोजणार संधी निर्माण व्हावी यासाठी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत रोजगार निधी दुप्पट केला जाणार आहे.

Web Title: Finance Minister gives relief to flood victims in Kolhapur-Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.