गरीब माता-पित्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:26 AM2021-04-13T04:26:36+5:302021-04-13T04:26:36+5:30

सिंदेवाही : शहरापासून आठ किलोमीटर अंतर असलेल्या पळसगाव जाट येथील मुलगी हरवलेली होती. दोन वर्षांपासून पळसगाव ...

Flowers smile on the faces of poor parents | गरीब माता-पित्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

गरीब माता-पित्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

Next

सिंदेवाही : शहरापासून आठ किलोमीटर अंतर असलेल्या पळसगाव जाट येथील मुलगी हरवलेली होती. दोन वर्षांपासून पळसगाव जाट येथून हरविलेल्या मुलीचा सिंदेवाही पोलीस शोध घेत होते. अखेर ती मुलगी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिला आई वडिलांच्या सुपूर्द केले.

दोन वर्षांपासून पळसगाव जाट येथील मुलगी हरवल्याची माहिती पोलीस स्टेशनकडे होती. दोन वर्षे शोध घेतल्यानंतर मुलगी दिल्ली येथे असल्याची माहिती मिळाली. ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील पीएसआय नेरकर, पोलीस हवालदार बावणे, अनुप आष्टनकर यांनी तिला दिल्ली येथून सुखरूप ताब्यात घेतले. दिल्ली येथून मुलीला सिंदेवाही येथे आणण्यात आले व तिच्या आई-वडिलांच्या सुपूर्द केले. दोन वर्षानंतर आपल्या मुलीची भेट झाल्यामुळे आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

Web Title: Flowers smile on the faces of poor parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.