रात्रीला चार दुचाकी व दोन सायकली जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:05 PM2019-02-25T23:05:01+5:302019-02-25T23:05:54+5:30

स्थानिक सरकार नगर स्थित हिरेंद्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या मोटारसायकलला अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्यामध्ये चार मोटरसायकल व दोन सायकल जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, नागरिक झोपेतून उठल्याने मोठी दुर्घटना टळली. रामनगर पोलिसांनी विणा गेडाम यांच्या तक्रारीविरुन आरोपीविरुद्ध कलम ४३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Four bikes and two bicycles were burnt in the night | रात्रीला चार दुचाकी व दोन सायकली जाळल्या

रात्रीला चार दुचाकी व दोन सायकली जाळल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्थानिक सरकार नगर स्थित हिरेंद्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या मोटारसायकलला अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्यामध्ये चार मोटरसायकल व दोन सायकल जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, नागरिक झोपेतून उठल्याने मोठी दुर्घटना टळली. रामनगर पोलिसांनी विणा गेडाम यांच्या तक्रारीविरुन आरोपीविरुद्ध कलम ४३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सहकार नगर येथील हिरेंद्र अपार्टमेंट उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वसाहतीमधील एक आहे. या वसाहतीमध्ये मागील काही दिवसांपासून पेट्रोल चोरीच्या घटना घडत होत्या. दरम्यान, रविवारी मध्यरात्री येथील एका महिलेला वायर जळण्याचा वास आला. त्यांनी आपल्या पतीला सोबत घेऊन पार्किंगमध्ये बघितले असता, मोटारसायकल जळताना आढळून आल्या. आग विझेपर्यंत एमएच ३४ वाय ३३३, एमएच ३४ पीआय २५९५, एमएच ३४ बीसी ०९९८, एमएच ३४ झेड ११९३ व दोन सायकल जळून खाक झाल्या. सदर वाहने श्याम शील, सुरेश कटमवार, सतीश गोंधळेकर व विलास रामटेके यांच्या मालकीची होती. याबाबत ठाणेदार प्रकाश हाके यांना विचारणा केली असता, घटनेचा तपास सुरू असून व्यक्तीगत अंतर्गत वादातून जाळले असण्याची शक्यता किंवा शॉर्ट सर्किटने आग लागण्याची शक्यता वर्तवली असून सीसीटीव्ही कॅमेरा तपासून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
सीसीटीव्हीमध्ये आढळला युवक
हिरेंद्र अपार्टमेंटमध्ये आग लावलेल्या गाडीशेजारी एक युवक सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला आहे. त्याच युवकाने सदर कृत्य केले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून सायबर विभागामार्फत त्याचा तपास केला जात आहे.

Web Title: Four bikes and two bicycles were burnt in the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.